आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोलरकोस्टरपेक्षा अवघड येथे वाहने चालवणे, कमकुवत मनाच्या लोकांचे कामच नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या उटाह स्थित भयंकर ठिकाण. या ठिकाणावर गाडी चालवणे खूप कठिण आहे. - Divya Marathi
अमेरिकेच्या उटाह स्थित भयंकर ठिकाण. या ठिकाणावर गाडी चालवणे खूप कठिण आहे.

पश्चिम अमेरिकेच्या उटाह परिसरातील एका ठिकाणावरून गाडी चालवण्यासाठी जगभरातून लोक येतात. हे ठिकाण भयावह खडकांवर गाडी चालवण्यासाठी ओळखले जाते. परंतु ज्यांना हृदयाचा आजार आहे किंवा ज्यांना अशा गोष्टी सहन होत नाहीत, त्यांना येथे येण्यास परवानगी दिली जात नाही. याला टाऊन ऑफ मॉब असेसुध्दा म्हटले जाते. छोटे शहर असूनदेखील वाळवंट आणि खडकांमुळे याला अॅडव्हेंचर लोक पसंत करतात. येथे माऊंटेन बाईकिंग आणि फोर व्हिलर ड्राइव्ह केली जाते.

 

येथे हेल रिव्हेंज नावाचा एक 13 किलोमीटरचा ट्रॅक आहे. हा ट्रॅक कमी आणि विविध खडकांच्या समूहांपासून बनलेला आहे. येथे गाडी चालवणे रोलर कोस्टरपेक्षा कठिण आहे. तरीसुध्दा अॅडव्हेंचर प्रेमी आपले कौशल्य दाखवण्यास मागे हटत नाहीत. ड्राइव्हरांना येथे अॅडव्हेंचरदरम्यान अॅडव्हान्स इक्विपमेंट ठेवावे लागते.

 

टोकावर पोहोचल्यानंतर अमेरिकेचे सुंदर ला साल खडक, घाट आणि कोलोराडो रिव्हर पाहण्याची संधीसुध्दा मिळते. टाऊन ऑफ मॉबमध्ये हेल रिव्हेंजप्रमाणे इतर ट्रॅकसुध्दा उपलब्ध आहेत. या ट्रॅकमध्ये काही ठिकाणी अडथळे आहेत, ज्याचे विविध नावे आहेत. जसे. एस्कलेटर, ब्लॅक होल, टिव ओव्हर चॅलेंज. परंतु सर्वात कठिण खडकाचे नाव Lion is Back आहे. येथे 65 डिग्रीवर कार चढावर चढवाव्या लागतात.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा लोक या भयावह ठिकाणावरून गाडी चालवतात...

बातम्या आणखी आहेत...