आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The White House If Donald Trump Becomes Next POTUS

हा बिझनेस टायकून US राष्ट्राध्यक्ष झाल्यास असे दिसेल व्हाइट हाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील रिअल इस्टेट टायकून डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानंतर काही वेळातच सोशल मीडियातून त्यांच्यासंबंधीची माहिती अपलोड होऊ लागली. यादरम्यान रेडिट युजर चेसट्रॅम यांनी हे छायाचित्र अपलोड केले.

अमेरिकी व्हाइट हाऊस तीनमजली असून त्याच्यासारखी दिसणारी एक २० मजली इमारत दाखवण्यात आली आहे. कारण ट्रम्प रिअल इस्टेट टायकून समजले जातात. चेसट्रॅम यांनी या छायाचित्राद्वारे असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, जर ट्रम्प देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले तर व्हाइट हाऊस अशा प्रकारे दिसेल. या पोस्टला अवघ्या तासांत ४३१ काॅमेंट्स आणि ३९५० ट्रेंड नोट प्राप्त झाल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प (६९) यांनी रिपब्लिकन पार्टीकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. या पक्षाकडून उमेदवारी जाहीर करणारी ती दुसरी व्यक्ती आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याच्या काही दिवस आधी ट्रम्प यांनी त्यांच्याकडे ५५८ अब्ज इतकी संपत्ती असल्याची घोषणा केली आहे.

- डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रोफाइलमध्ये बिझनेस मॅग्नेट, इन्व्हेस्टर, टीव्ही पर्सनॅलिटी, ऑर्थर, पॉलिटिशियन टॅग जोडले गेले आहेत. २०१३ मध्ये त्यांनी ही निवडणूक लढवावी की नाही याचा सर्व्हे करण्यासाठी कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे.