अमेरिकेमध्ये व्योमिंग, मोन्टाना आणि आयडाहो सीमा क्षेत्रात स्थायिक असलेले येलोस्टोन नॅशनल पार्क हे खूपच आकर्षक आणि सुंदर आहे. याची स्थापना आणि पाहणीची सुरूवात करण्यासाठी 1 मार्च 1872 रोजी राष्ट्रपति यूलिसेस एस ग्रांटने प्रस्ताव देऊन कायदेशिररित्या केली होती. हे अमेरिकेमधील पहिले पार्क आहे.
अनेक पर्वातांच्या रांगांना जोडणारे हे नॅशनल पार्क 22 लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळामध्ये पसरलेले आहे. असे सांगितले जाते, की 11 हजार वर्षांपूर्वी मुळत: अमेरिकेचे रहिवासी असलेले पूर्वज येलोस्टोनच्या जंगालातच राहत होते. 1860पर्यंत इथे कोणतेच इव्हेंट झाला नाही.
1917मध्ये पार्कची जबाबदारी नॅशनल पार्क सर्व्हिसला देण्यात आली.
प्राण्यांची सुरक्षा
हा अमेरिकेचाच नव्हे तर जगातील पहिले पार्क आहे. याच्यानंतर दुस-या देशांनीसुध्दा नॅशनल पार्क आणि वन्यजीवांसाठी एक चांगली सुविधा केली.
असे ठेवण्यात आले येलोस्टोन नाव
येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये नद्या, घाट, तलाव, धबधबे आणि पर्वत आहेत. त्यातील एका तलावाचे नाव 'येलोस्टोन' आहे. त्याला अमेरिकेच्या उत्तर भागातील सर्वात मोठा तलाव म्हणून ओळखले जाते. हा भव्य ज्वालामुखी पर्वत 'येलोस्टोन काल्डेरा'वर स्थायिक आहे. त्याला आजही सक्रिय असल्याचे मानले जाते. अशी म्हटले जाते, की जेव्हा त्यातून लाव्हा बाहेर पडल्या होत्या त्यांना पिवळ्या रंगाची विशिष्ट चमक होती. त्यामुळे या ठिकाणाचे नाव येलोस्टोन पडले.
गरम पाण्याचे फवारे
या नॅशनल पार्कचे अनेक वैशिष्टे आहेत. त्यामधील सर्वात वेगळे वैशिष्ट म्हणजे त्यातून निघणारे गरम पाण्याते फवारे. 1870मध्येच याला ओल्ड फेथफुल असे नाव देण्यात आले होते. याला मोस्ट प्रिडेक्टेबससुध्दा म्हटले जाते. कारण हा प्रत्येक 91 मिनीटांच्या अंतरावर वर येतो. बघणा-यांना यापासून शेकडो मिटर दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. फव्वारा जेव्हा वर येतो तेव्हा त्याची उंची 106 फुट ते 185 फुटपर्यंत असते. एकवेळी हा फवारा हजारो लिटर पाणी बाहेर फेकतो. या वैशिष्ट्यामुळे या ठिकाणाचे नाव अपर गीझर बेसिन ठेवण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा या पहिल्या नॅशनल पार्कची काही खास आणि न बघितलेली छायाचित्रे...