आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The World\'s Steepest Cogwheel Railway Is In Switzerland

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भयावह आहे हा रेल्वे ट्रॅक, इतक्या तीव्र उतारावरून धावते ट्रेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्वित्झर्लंडमध्ये सर्वात भयावह उतारावर चालणारी रेल्वे)
स्वित्झर्लंडमध्ये एक रेल्वे ट्रॅक आहे, जिथे ट्रेन जगात सर्वात मोठ्या उतारावरून रेल्वे धावते. येथे रेल्वे जवळपास दोन हजार मीटर उंचीपर्यंत जाते. स्वित्झर्लंडच्या पिलाटस रेल्वे सेवेकडून चालवली जाणारी ही ट्रेन अल्पनाचस्ताद आणि माऊंट पिलाटसला जोडते. ट्रॅकची लांबी जवळपास 4.5 किलोमीटर आहे आणि रेल्वे इतक्या वेळात 1600 मीटर इतका उतार चढते. याचे उद्घाटन 1889मध्ये झाले होते. या लाइनला बनवण्याचा प्रस्ताव 1873मध्ये देण्यात आला होता.
सुरुवातीला ही ट्रेन वाफेवर चालत होती, मात्र नंतर तिला इलेक्ट्रिक करण्यात आले.
याचा वेग 9 किलोमीटर प्रती तास आहे. सुरुवातीला ही ट्रेन केवळ 3-4 किलोमीटर प्रती तास चालत होती. सध्याच्या वेगानुसार ट्रेन अर्ध्या तासात प्रवास पूर्ण करते. ट्रेनच्या इंजिन आणि डब्ब्यांमध्ये बदल झाला असला तरी अनेक वर्षांनंतर 100 वर्षे जूनाच ट्रॅक वापरला जात आहे. हा ट्रॅक केवळ मे ते नोव्हेंबरमध्ये चालू केला जातो. ट्रेन प्रत्येक 45 मिनीटांच्या अंतराने धावते. हिवाळ्यात लोक केबल कारच्या सहाय्याने पिलाटवर जातात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, इतक्या तीव्र उतारावरून कशी धावते रेल्वे...