आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Shocking Methods Are Being Used In Venezuela For Making Miss World

ऐश्वर्या बनली होती Miss World, या देशात मिस वर्ल्ड बनवण्यासाठी करतात अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 नोव्हेंबर 1994 अर्थातच आजच्या ठिक 21 वर्षांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चनला दक्षिण आफ्रिकेच्या सन सिटीमध्ये Miss Worldचा किताब देण्यात आला होता. एका भारतीय तरुणीसाठी मिस वर्ल्ड किताब जिंकणे खूप कठिण असते, परंतु तिने हा करिश्मा करून दाखवला. कारण या ब्यूटी कॉम्पिटीशनचा ताज डोक्यावर सजवण्यासाठी जगभरात अनेक तरुणी स्पर्धेत असतात. काही देशातील तरुणींना 'क्रूर' पध्दतीने तयार करून या स्पर्धेत पाठवले जाते. असाच एक देश आहे व्हेनेझूएला.
आज आम्ही तुम्हाला व्हेनेझूएलामध्ये मिस वर्ल्ड बनण्यासाठी कोण-कोणत्या 'शॉकिंग ट्रिटमेंट्स' दिल्या जातात त्याविषयी सांगणार आहोत...
व्हेनेझुएलामधून आतपर्यंत 6 मिस वर्ल्ड, सात मिस यूनिव्हर्स, परंतु...
व्हेनेझुएला असा देश आहे, ज्याने जगाला सर्वात सुंदर तरुणी दिल्या आहेत. व्हेनेझुएलामधून आतपर्यंत 6 मिस वर्ल्ड, सात मिस यूनिव्हर्स, 6 मिस इंटरनॅशनल आणि दोन मिस अर्थ बनल्या आहेत. मात्र या देशाचा आणखी एक चेहरा आहे. या देशातील मुलींना क्रूर पध्दतीने मिस वर्ल्डसाठी तयार केले जाते. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर येथे हा ट्रेंड सेट झाला आहे. येथील गरीब कुटुंबीय आपल्या मुलीला मिस वर्ल्ड बनवण्यासाठी दबाव टाकतात. जेणेकरून त्यांचे आयुष्य बदलेल.
कमी वयातच सुडौल दिसण्यासाठी केली जाते शस्त्रक्रिया-
रिपोर्ट्नुसार, व्हेनेझुएलामध्ये शेकडो संख्येत ब्यूटी अॅकॅडमी आहेत, त्यांना इंटरनॅशनल मीडिया ब्यूटी फॅक्ट्रीसुध्दा म्हटले जाते. या ब्यूटी फॅक्ट्रीमध्ये मुलींना कमी वयातच पाठवले जाते. मुलींवर स्लिम होण्यासाठी दबाव टाकला जातो. काहीवेळा त्यांना कमी जेवण देऊन उपाशी ठेवले जाते. कमी वयातच त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया केल्या जातात. जेणेकरून त्यांचे शरीर सुडौल राहू शकेल. व्हेनेझुएलामध्ये मुलींना ब्यूटी पेजेंट बनवण्यासाठी अनेक शॉकिंग ट्रिटमेंट दिल्या जातात. वयाच्या केवळ 8व्या वर्षीच उंची वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन दिले जाते. बट इम्प्लांट करण्यासाठी त्यांच्या शरीरावर शस्त्रक्रियासुध्दा केल्या जातात.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या व्हेनेझुएलाच्या ब्यूटी फॅक्ट्रीच्या शॉकिंग ट्रिटमेंट्सविषयी...