आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Two Restaurants Are Served By Skating Waiters

या हॉटेलमध्ये स्केटींग करत जेवण सर्व्ह करतात वेटर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही कारमध्ये बसले आहात आणि तुम्ही ऑर्डर केलेले जेवण वेटरने स्केटींग करत तुम्हाला कारमध्येच आणूण दिले तर तुम्ही निश्चितच आनंदी व्हाल ना... आता तुम्ही असे प्रत्यक्ष करू शकता. अमेरिकेतील सोनिक ड्राइव्ह इन आणि रुबीज डिनर या चेन रेस्तरांने ही सुविधा सुरू केली आहे. 48 हॉटेल चालवणा-या रुबीज डिनरने असे पहिले रेस्तरां कॅलिफोर्नियामध्ये सुरू केले आहे. तर सोनिक हॉटेलने ही सुविधा परत एकदा सुरू केली आहे. या दोन्ही हॉटेलमधील विशेष गोष्ट म्हणजे येथे जेवण सर्व्ह करणा-या मुली डान्सिंग स्केटींग करत तुमच्या कारपर्यंत पोहोचतात. विकेंडला तर या दोन्ही रेस्तरांच्या पार्कींगमध्ये जागाही मिळत नाही. लोकांना त्यांचा नंबर येण्याची वाट पाहत थांबावे लागते. या दोन्ही हॉटेल्सनी महिला वेटर्सचा विमा काढलेला आहे. त्यांना टी गिअर घालण्याचे सांगितले जाते. पण त्या तसे करण्यास नकार देतात.

1960-1970 च्या दशकात सोनिक रेस्तरांची याचसाठी खास ओळख निर्माण झाली होती. 3500 युनिट असणा-या या रेस्टॉरंन्टने 1980-90 मध्ये ही सुविधा बंद केली. आता न्यु कॅरोलिनामध्ये सोनिक ही सुविधा पुन्हा एकदा सुरू करणार आहे. या हॉटेलमध्ये बर्गर, पिझ्झा, फ्राइस आणि फळांचा आंनद तुम्ही कारमध्ये बसल्या बसल्या घेऊ शकता.

रुबी डिनरचे सीईओ डाउग केवनफ सांगतात, की या काळात सगळेच लोक काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्हीही बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांना लोकांकडून चांगला रिसपॉंन्स मिळत आहे. विकेंडचा प्रश्न सोडवण्यासाठी आता ते आणखी वेटर हायर करणार आहेत. आता त्यांच्या हॉटेलमध्ये 10 स्केटर्स वेटर काम करत आहेत. डाउग म्हणतात, की स्केटरेस डान्स करत तुमची ऑर्डर आणतात. त्यामुळे खुप चांगले फिलींग येते. कारमध्ये प्रायव्हसी तर मिळतेच पण त्याचबरोबर तुमच्या आवडत्या संगीताचा आनंद घेऊ शकता.

पुढील स्लाइडवर पाहा या रेस्तरांचे काही खास फोटो...