आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक शोषणासाठी बदनाम आहे 'बच्चाबाजी', मुली बनून नाचतात मुले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडिलांच्या मृत्यूनंतर शहरयार नावाचा हा आफगाणिस्तानी तरुण वयाच्या 17व्या वर्षी डान्सर बनला होता. आर्थिक तंगीमुळे तो आपल्या उस्तादला भेटला होता. उस्ताद एजेंटच्या रुपात काम करतो. - Divya Marathi
वडिलांच्या मृत्यूनंतर शहरयार नावाचा हा आफगाणिस्तानी तरुण वयाच्या 17व्या वर्षी डान्सर बनला होता. आर्थिक तंगीमुळे तो आपल्या उस्तादला भेटला होता. उस्ताद एजेंटच्या रुपात काम करतो.
काबुल- आफगाणिस्तानमध्ये मुलांना मुलींचे कपडे घालून नाचण्याची प्रथा आहे. या प्रथेला 'बच्चाबाजी' म्हटले जाते. पार्टीत नाचल्यानंतर काही लोक मुलांचे लैंगिक शोषणसुध्दा करतात. नाचणा-या या मुलांना 'बच्चा बेरीश' म्हटले जाते.
एकापेक्षा जास्त मुलांवर मालकी हक्क असणे म्हणजे 'गर्वा'ची गोष्ट-
मुलांना 'बच्चा बेरीश' बनवल्यानंतर समाज आणि कुटुंबीय त्यांचा त्याग करतात. कलंक मानले जाणारी ही मुले आफगाणच्या सरदारांचेसुध्दा मनोरंजन करतात. या मुलांवर प्रभावी व्यक्तींचा मालकी हक्क असतो. ही प्रथा आफगाणिस्तानच्या पुरुषांच्या मनोरंजनसाठी सुरु करण्यात आली होती. परंतु आता काही लोकांनी याला सेक्स स्लेवरीचे रुप दिले आहे. वयस्कर लोक येथे सेक्स करण्यासाठी येतात.
बच्चाबाजीचे काही महत्वाचे फॅक्ट्स-

- 10 वर्षांच्या आसपासच्या वयाच्या मुलांना लैंगिक समाधानासाठी 'बच्चा बेरीश' बनवले जाते.
- आफगाणिस्तानमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या नृत्यूवर बंदी आहे, म्हणून 'बच्चाबाजी' मनोरंजनचे साधन आहे.
- मुलांना शिक्षण आणि काम देण्याचे आमिष दाखवून त्यांना यात अडकवले जाते.
- शिक्षण आणि कामांऐवजी या मुलांना मुलींचे कपडे घालणे, मेकअप करणे, डान्स करणे आणि लोकांचे मनोरंजन करण्यास शिकवले जाते.
- बच्चा बेरिशवर 2009मध्ये एका डॉक्युमेंट्रीसुध्दा बनवण्यात आली आहे. याचे टायटल 'दी डान्सिंग ऑफ आफगाणिस्तान' आहे.
- डान्सनंतर या बच्चा बेरीशांचे पार्टीत आलेल्या लोकांकडून लैंगिक शोषण केले जाते.
- डॉक्युमेंट्री बनवणा-या फोटोग्राफर बरत अली बतूरने सांगितले, की पार्टीमधून बेरीशांची काहीच कमाई होत नाही.
- आफगाणिस्तानमध्ये एक प्रसिध्द म्हण आहे, 'महिलाएं बच्चे पैदा करने के लिए है और लडके संतुष्टि के लिए'
- दुस-या देशांत अशाप्रकारचे काम मानसिक आजार मानला जातो. परंतु आफगाणिस्तान पोलिस बच्चाबाजी करणा-यांच्या विरोधात कारवाई करत नाहीत. कारण यामागे पॉवरफुल लोकांचा हात असतो.
- अली बतूर सांगतो, की यामधील अनेक बच्चा बेरीश सत्यापासून वाचण्यासाठी ड्रग्स घेतात. हिरोईन घेऊन पार्ट्यांमध्ये जाण्यापासून पळ काढतात. तरीदेखील त्यांना पार्ट्यांमध्ये नाचण्यासाठी जावे लागते.
- तालिबान आल्यापासून बच्चाबाजी बंद झाली होती, परंतु जसे-जेस तालिबानचा प्रभाव कमी झाला बच्चाबाजी पुन्हा सुरु झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुलींचे कपडे परिधान करून नाचणा-या 'बच्चा बेरीश' आणि 'बच्चाबाजी'चे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...