आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG : या 'बार्बी डॉल'चे सत्य आहे अचंबित करणारे, PHOTOS बघून बसणार नाही विश्वास!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्र बघता प्रथमदर्शनी ही एखादी बार्बी डॉल असल्याचे तुम्हाला वाटेल. पण जरा लक्षपूर्वक पाहिले तर ही बार्बी डॉल नसून जीवंत तरुणी असल्याचे तुमच्या लक्षात येईल. छायाचित्रात बार्बी डॉलसारखी दिसणारी ही तरुणी चायनीज ब्लॉगर आणि मॉडेल किना सेन (Kina Shen) आहे. मेकअप आणि वेशभूषेमुळे किना चर्चेत आली आहे. 
 
फोटोज होत आहेत व्हायरल...
किना 25 वर्षांची असून तिचे या लूकमधील फोटोज मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोजमधील तिचा लूक बघून यूजर्स हैराण आणि अचंबित होत आहेत. एका वेबसाइटनुसार, किना 2013 पासून इन्स्टाग्राम या सोशल साइटवर अॅक्टिव असून तिचे तब्बल पाच लाख फॉलोअर्स आहेत. किना तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मेकअप आणि विविध आउटफिटमधील छायाचित्रे नित्यनेमाने शेअर करत असते. या छायाचित्रांमध्ये ती अगदी बार्बी डॉलसारखी दिसते.
 
इतकेच नव्हे तर किनाने स्वतःची हॉरर लूकमधील छायाचित्रेदेखील शेअर केली आहेत.  या विविध छायाचित्रांच्या माध्यमातून किना आता चीनी मीडियामध्ये सेलिब्रिटी ठरली आहे. इन्स्टाग्रामव्यतिरिक्त चीनच्या फोटो शेअरिंग साइट्सवरदेखील तिची छायाचित्रे लोकप्रिय होत आहेत. किना अशाच आउटफिटची निवड करते, ज्यात तिचा लूक एखाद्या डॉलसारखा दिसेल. प्रथमदर्शनी किनाची छायाचित्रे बघून ती बार्बी डॉलच असल्याचा भास बघणा-याला होतो.   

पुढील स्लाईड्सवर बघा, किनाचे विविध लूकचे Photos...
बातम्या आणखी आहेत...