आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका व्हॅनमध्ये आयुष्य काढत आहे हे कपल, आतून असा आहे नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील हे कपल अनोख्या पद्धतीने स्वतःचे आयुष्य जगत आहेत. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी माईक शिसलर आणि त्याची पत्नी जेसिकाने आपली लाईफ एका व्हॅनमध्ये जगण्याचे ठरवले. हे कपल आता याच व्हॅनमध्ये वास्तव्यास आहे. स्वयंपाक करण्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व कामे या गाडीतच करतात.

सध्या करत आहेत संपूर्ण अमेरिकेचा दौरा
- या कपलने आता व्हॅनमध्ये राहूनच संपूर्ण अमेरिका फिरण्याचा निश्चय केला आहे. नुकतेच हे फ्लोरिडा येथे पोहोचले असून यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

स्वतः मॉडिफाय केली संपूर्ण व्हॅन
- पेशाने आर्किटेक्ट असलेल्या माईकने पत्नीची मदत घेऊन व्हॅनला एका घराप्रमाणे डिझाईन केले आहे.
- सर्वात पहिले यांनी एक मर्सिडीज स्प्रिंटर व्हॅन 15000 डॉलर्समध्ये विकत घेतली. त्यानंतर यामध्ये किचन, बेडरूम, डायनींग आणि रेस्टरूम तयार केली. हे संपूर्ण काम करण्यासाठी यांना 40 तास लागले.

जेसिका आहे वैज्ञानिक 
- माईकची पत्नी जेसिका सायंटिस्ट आहे. तिने सांगितले की, मेडिकल रिसर्च फिल्डमध्ये फ्रस्टेट झाल्यानंतर तिने माईकला व्हॅनमधून संपूर्ण जग फिरण्याची आयडिया दिली होती.

आतापर्यंत फिरले आहेत 28000 किलोमीटर अंतर
माईक आणि जेसिकाने एप्रिल महिन्यात या व्हॅनमधून फिरण्यास सुरुवात केली. आतापर्यंत एकूण 28000 किलोमीटर अंतर कापले आहे. या दरम्यान त्यांनी यूएसमधील 38 स्टेट आणि कॅनडाची सफर केली आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, व्हॅनमध्ये कशाप्रकारे आयुष्य जगत आहे हे कपल...
बातम्या आणखी आहेत...