आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानव नाही दानवांनी बनवली आहे ही गुफा, संशोधकांनाही नाही बसला विश्‍वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुहेचे निरीक्षण करताना संशोधक. - Divya Marathi
गुहेचे निरीक्षण करताना संशोधक.
ब्राझिलच्‍या रेन फॉरेस्‍टमध्‍ये काही महिन्‍यांपूर्वी संशोधकांना एक गुहा आढळली आहे. या गुहेला पाहून सर्वांनीच हिच्‍या रचनेबद्दल आश्‍यर्च व्‍यक्‍त केले. जमिनीच्‍या खाली ही गुहा जवळपास 2000 फुट लांब आणि 6 फुट उंच आहे. मात्र आकारमानापेक्षाही गुहेच्‍या रचनेने लोकांना जास्‍त हैरान केले. ही गुहा गोल आकाराची असून इतक्‍या चांगल्‍या पध्‍दतीने बनवण्‍यात आली आहे की, नैसर्गिक पध्‍दतीने अशी गुहा बनणे शक्‍यच नसल्‍याचे संशोधकांनी म्‍हटले आहे. 
 
मानव अशी गुहा बनवु शकतो का? 
- याबाबत संशाधकांचे मत आहे की,  त्‍याकाळी मानवाद्वारे अशी गुहा बनवणे शक्‍य नव्‍हते. तसेच कोणत्‍याही भौ‍गोलिक रचनेमुळेही अशी गुहा बनत नाही. त्‍यामुळे याची निर्मिती कोण्‍यातरी दैत्‍य जीवाने केली असावी. 
 
कोण असावा तो दैत्‍य जीव? 
- गुहेच्‍या भिंतींवर असे निशाण आढळले आहेत, जे एखाद्या दैत्‍याकार जीवाचे असू शकतात. संशोधकांनुसार याला दानव म्‍हणल्‍यासही चुकीचे होणार नाही. हा असा विलूप्‍त जीव असू शकतो जो 9 हजार वर्षांपूर्वी पृथ्‍वीवर राहत असावा. मात्र संशोधकांमध्‍ये सध्‍यातरी सर्वात मोठा प्रश्‍न हा जीव नेमका कोण होता? हाच आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, या रहस्‍यमयी गुहेचे फोटोज आणि सोबतच कोणता जीव असू शकतो यामागे... 
 
बातम्या आणखी आहेत...