आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहरात एकही रस्‍ता नाही, तरीही कसे येणेजाणे करतात लोक?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर एखाद्या शहरात रस्‍तेच नसतील तर तुम्‍ही त्‍या शहरात फिराल कसे? याच उत्‍तर आहे कालव्‍याद्वारे. नेदरलँडमध्‍ये असे एक शहर आहे. या शहराला नेदरलँडचे व्‍हेनिस म्‍हटले जाते. याचे नाव आहे गिएथूर्न. या शहरात 2,600 लोक राहतात. या शहरात प्रत्‍येक‍ ठिकाणी जाण्‍यासाठी कालव्‍यांचा वापर केला जातो. शहरात दुरदुरपर्यंत पसरलेल्‍या शेतांना 176 लाकडी पुलांद्वारे जोडण्‍यात आले आहे. या सुंदर  शहराला भेट देण्‍यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र शहरात येताना पर्यटकांना आपले वाहन शहराबाहेर ठेवण्‍याची सूचना केली जाते. येथे पर्यटक होड्यांद्वारे संपूर्ण शहराचा प्रवास करतात.


काय आहे या जागेची खासियत?
- गिएथूर्न या शहराचा शोध 18व्‍या शतकात लागला. सतत वाढणा-या पर्यटकांच्‍या संख्‍येमुळे शहरात अनेक हॉटेल्‍स आणि रेस्‍टॉरंट बनवण्‍यात आले आहे. या शहरात पोस्‍टमनही आपले पत्र नावेद्वारेच वाटतो. कार आणि बाईकपासून दूर असलेले हे शहर यामुळेच पर्यटकांच्‍या पसंतीचे बनले आहे. हिवाळ्यात आईस स्‍केटींगसाठीही पर्यटक येथे मोठी गर्दी करतात.

 

गिएथूर्नमध्‍ये एवढ्या कालव्‍यांचे निर्माण कसे झाले?
18व्‍या शतकात लोक जेव्‍हा प्रथम येथे आले. तेव्‍हा आढळून आले की पुरामुळे या शहरात जागोजागी चिखल आणि दलदल निर्माण झाली आहे. तेव्हा लोकांनी येथील माती मिळवण्‍यासाठी जागोजागी खोदकाम सुरु केले. कालांतराने या खोदलेल्‍या जागांमध्‍येच कावले निर्माण झाले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, गिएथूर्न शहराचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...