आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 वर्षांपासून भंगारात पडून होती ही स्‍कूलबस, आतमधील दृश्‍ये पाहून बसणार नाही विश्‍वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधीकधी आपल्‍यासमोरच असे काही लपलेले असते जे आपल्‍याला दिसत नाही किंवा आपणच त्‍याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करतो. असाच एक किस्‍सा फ्लोरीडामध्‍ये समोर आला आहे. येथे कित्‍येक वर्षांपासून एक शाळेची बस मैदानात पडून होती. लोकांनीही तिच्‍याकडे फार लक्ष दिले नाही. मात्र एकेदिवशी एका व्‍यक्‍तीला या बसच्‍या आत काय आहे, हे पाहण्‍याची इच्‍छा झाली. जेव्‍हा त्‍याने बसच्‍या आत पाहिले तेव्‍हा त्‍याचा त्‍याच्‍या डोळ्यावर विश्‍वास बसला नाही. 

आतमध्‍ये होते सर्व सोयीसुविधांनी सुसज्‍ज असे घर  
-  '1953 वेबबोन्‍ड' ही गाडी मागील 6 दशकांपासून फ्लोरीडातील एका मैदानावर पडून आहे. पिवळ्या रंगाच्‍या या गाडीवर तसे लक्ष देण्‍यासारखेही काही नव्‍हते. लोकांना वाटेल की, एवढ्या जुन्‍या गाडीमध्‍ये तुटलेल्‍या, खराब फर्निचरशिवाय दुसरे काय असणार आहे. 
- मात्र 2003मध्‍ये एक व्‍यक्‍ती जेव्‍हा या बसमध्ये शिरला तेव्‍हा त्‍याला त्‍याच्‍या डोळ्यावर विश्‍वासच बसला नाही. त्‍या बसमध्‍ये एक अख्‍खे घर वसलेले होते. तेही पूर्णपणे सुरक्षित, अगदी नविन जसेच्या तसे. 1950मधील त्‍या फर्निचर वर फक्‍त धुळ साचलेली होती.  
-  इतक्‍या वर्षांपासून बंद असलेल्‍या या बसमध्‍ये कोणीही राहू शकत होते. मात्र बाहेरुन बघुनच आतमध्‍ये असे काही असेल, असे कोणालाच वाटले नाही. 
- यागाडीमध्‍ये लिव्हिंग रुमपासून किचनपर्यंत सर्व सोयीसुविधा उपलब्‍ध होत्‍या. रुममधील फ्रीज आणि स्‍टोव्‍ह अजुनही चालु अवस्‍थेत होते. 

असे उघड झाले गुपित 
2003 मध्‍ये हेनरी वल्‍लास नामक व्‍यक्‍तीने या गाडीची खरेदी केली. त्‍यानंतर त्‍याला आतमध्‍ये हा एकप्रकारचा खजानाच आढळला. नंतर या बसच्‍या आतमधील फोटोजने इंटरनेटवर चांगलीच धुम केली होती. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, बसच्‍या आतील फोटोज...      

 
बातम्या आणखी आहेत...