आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावळ्या रंगाबाबत लोकांचे मत बदलण्यासाठी लोकांच्या मानसिकतेवर हल्ला आहे ही सेल्फी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अगदी जुन्या काळापासून प्रत्येक भारतीय गोरा रंग हेच सौंदर्याचे परिमाण असल्याचे समदत आलेला आहे. विशेतः मुलींसाठी हा नियम लावला जातो. मुलगी गोरी असेल तरच तिला सुंदर समजले जाते. लोकांच्या याच मानसिकतेवर हल्ला करत सध्या सोशल साईट्सवर #unfairandlovely ट्रेंड होत आहे. 

एका सेल्फीने बदलला दृष्टीकोन 
सध्या सोशल साईट्सवर तीन तरुणींचा सेल्फी व्हायरल होत आहे. त्याबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, भारताचा चेहरा जो ते तुम्हाला दाखवणार नाहीत. या सेल्फीमध्ये तीन सावळ्या रंगाच्या तरुणी साडी आणि दागिने परिधान करून पोज देताना दिसून आल्या. ही सेल्फी सर्वात आधी अबिरामी रविचंद्रन पिल्लई यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केली होती. त्याला The Uncanny Truth Teller 2 नावाने फेसबूकवर शेयर केले जात आहे. तेव्हापासून आतापर्यंत हा फोटो 40 हजारांहून अधिक वेळा शेयर झाला आहे. 

इन्स्टाग्रामवर ट्रेंडींगमध्ये 
फोटो व्हायर झाल्यानंतर सावळ्या रंगाच्या तरुणींनी याच्या सपोर्टमध्ये त्यांचे फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामवर #unfairandlovely ट्रेंड करत आहे. एकिकडे लोक या कॅम्पेनचे कौतुक करत आहेत तर काही बॉलिवूड स्टार्सच्या फेयरनेस क्रीम्सच्या प्रमोट करण्याला विरोधही करत आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, कॅम्पेनला सपोर्ट करण्यासाठी पोस्ट करण्यात आलेले काही सेल्फी.. 
बातम्या आणखी आहेत...