कॅलिफोर्निया- आतापर्यंत तुम्ही बार्बी डॉलचे अनेक रुप पाहिले असतील. परंतु अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरात एक अशी युवती राहते, जी हुबेहुब बार्बी डॉलसारखी दिसते. या 28 वर्षीय तरुणीने नाव अंबर गजमॅन आहे. अंबरला मस्क्यूलर डायस्ट्रोफी नावाचा आजार आहे. या पिडीत व्यक्तीच्या मांसपेशी कमजोर पडतात. आतापर्यंत या आजारावर कोणत्याच उपचाराचा शोध लागलेला नाहीये.
अंबर सांगते, की शारीरिकरित्यासुध्दा बाहुलीसारखी दिसते. मस्क्युलर डायस्ट्रोफीमुळे तिला खाण्या-पिण्यादेखील अडचण येते. त्यामुळेच तिचे वजन कमी असून बाहुलीसारखी स्लिम झाली आहे. ती व्यवस्थित चालूसुध्दा शकत नाही. प्रत्येक कामात तिला कुणाच्या ना कुणाच्या मदतीची गरज पडते. त्यामुळे तिला वाटत ती डॉलसारखी आहे.
अंबर बालपणीपासूनच मॉडेलिंगमध्ये सक्रिय आहे. वयाच्या आठराव्या वर्षी लग्न झाल्यानंतर काही वर्षांतच तिला स्वत:च्या शरीराविषयी शंका निर्माण व्हायला लागल्या. तिला अनेकदा जाणीव व्हायची, की तिचे कपडे एखाद्या वजनदार सूटप्रमाणे आहेत. ती कोणतेच काम स्वत: करण्यासाठी असमर्थ होती. डॉक्टरांच्या संशोधनामध्ये माहित झाले, की तिला मक्स्क्युलर डायस्ट्रोफी नावाचा आजार आहे. त्यानंतरसुध्दा तिने हार मानली नाही आणि बार्बी डॉलसारखी नटून स्वत:चे फोटो सोशल साइट्सवर शेअर करू लागली.
तिला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काही दिवसांत तिला दहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी फॉलो केले. तिने स्वत:च्या लुकला आणखी उजळण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे राहून आणि स्वत:ची जीवनशैली बदलून तिला या आजाराशी लढण्याचे बळ मिळाले. अंबर आता आपल्या व्हिडिओ बनवून या आजारविषयी जागृती करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बार्बी डॉलसारखी दिसणा-या अंबरचे खास फोटो...