आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुटकी म्हणून लोक उडवायचे खिल्ली, आता सुपर मॉडेल बनून दिले उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्ट ही सुंदर असते, मात्र काही लोक थोड्या वेगळ्या दिसणाऱ्यांची खिल्ली उडवतात. अमेरिकेतील नेवादा येथे जन्मलेली द्रु प्रेस्टाही अशाच लोकांच्या टोमण्यांनी त्रस्त होती. कमी उंचीमुळे प्रत्येकजण तिची खिल्ली उडवत होता. 

 

1 मीटर उंचीची मॉडेल 
- 21 वर्षांची द्रु प्रेस्टा सध्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय झाली आहे. द्रु प्रेस्टा जन्मतः achondroplasia ग्रस्त आहे. त्यामुळे तिची उंची वाढली नाही. ती 3 फूट चार इंच (जवळपास 1 मीटर) आहे. यामुळे लोक तिला बुटकी म्हणून चिडवायचे. तिच्या कुटुंबातील या आजाराची ती पहिली शिकार होती. त्यामुळे या शारीरिक व्यंगाचा तिच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा इतरांना अंदाज येणे कठीणच होते. प्रेस्टा घराबाहेर पडली की लोक तिची खिल्ली उडवत होते. यामुळे ती नेवादा येऊन लॉस एंजल्स येथे शिफ्ट झाली. उंची कमी असली तरी जिद्द कुठेही कमी नव्हती. या जिद्दीच्या जोरावरच प्रेस्टाने फॅशन इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. आज ती फॅशन इंडस्ट्रीतील पॉपूलर मॉडल आहे. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी तिचे हे मोठे काम आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, या हॉट सुपर मॉडेलचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...