आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाने हरणाची शिकार करून फरफटत नेले नदीत, पाहा छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रात एक वाघ कसा हरणाला तोंडात पकडून फरफटत नेतोय. या वाघाने अतिशय वाईट पध्दतीने हरणाची शिकार केली. प्राण्यांच्या शिकारीची लढत तुम्ही अनेकदा पाहिली असेल, मात्र ही लढाई थरकाप उडवणारी आहे. ही छायाचित्रे महाराष्ट्राच्या तडोबा अंधारी टायगर रिझर्व्हमधील असून फोटोग्राफर सुधीर शिवरामने क्लिक केली आहेत.
तुम्ही वरील छायाचित्रांमध्ये पाहू शकता, की वाघाने झाडाझुडपांमध्ये घुसून एका हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न केला. वाघाने गतीने दोन हरणांकडे धाव घेतली, मात्र वाघाला पाहून घाबरलेल्या हरणांनी आपल्या पळण्याचा वेग वाढवला. परंतु या भयावह प्राण्यापुढे दोन निरागस हरणांपैकी एकीचा प्राण गेला. वाघाने अखेर एका हरणाची शिकार केली. त्यातील एक हरण पळून जाण्यात यशस्वी झाली.
परंतु जी हरिण वाघाच्या तावडीत सापडली ती अशी फसली, की तिच्याकडे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. वाघाने अखेर तिला मारून नदीत ओढत नेले आणि तिचे मांस खाल्ले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शिकारीच्या लढाईची अंगावर शहारे आणणारी छायाचित्रे...