(चीनमध्ये तयार करण्यात आलेला पारदर्शी ब्रिज.)
चीनमध्ये अशी काही ठिकाणे आहेत, जी एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीत. अशाच अमेझिंग प्लेसेसमध्ये दक्षिण चीनमधील हुनान प्रांतातील पिंगजौंग पर्वतावर तयार करण्यात आलेल्या पारदर्शी ब्रिजचा समावेश होतो. तब्बल 300 मीटर उंच असलेल्या या पुलाचा पृष्ठभाग पारदर्शी काचेपासून तयार करण्यात आला आहे. पुलावरुन चालत जाताना खालील दृष्य बघितल्यावर भोवळ आल्यासारखे वाटते.
पर्यटकांसाठी हा पूल नुकताच खुला करण्यात आला आहे. पर्यटकांच्या मदतीसाठी खास पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आलेले कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पूलावरुन चालत जाताना पर्यटकांची हिंमत हळूहळू खचायला लागते. त्यानंतर पर्यटक पुलाच्या मधून चालत जात नाहीत. पुलाच्या शेजारी असलेल्या रेलिंगला धरुन पुढे पुढे जातात. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे असतात.
पुढील स्लाईडवर बघा, या पूलावरुन चालत जात असलेल्या पर्यटकांची छायाचित्रे....