आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न बुडणा-या या जहाजाची अवघ्या 3 तासांत संपली होती संपूर्ण कहाणी, बघा Rare Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टायटॅनिक म्हटलं की आठवतं ते भलंमोठं जहाज. हे अतिशय विशाल असं जहाज होतं. 10 एप्रिल 1912 रोजी इंग्लंडमधील साउथहँप्टन येथून हे जहाज न्यूयॉर्क शहराकडे सफरीला निघाले होते. 4 दिवसांनी 14 एप्रिल 1912 रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या धडकेत टायटॅनिक बुडाले. एकुण 2227 प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी 1517 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो. जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे दोन प्रमुख कारण होते. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील (1178) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. दुसरी बाब म्हणजे टायटॅनिक वरील बरयाच जणांना घटनेचे गांभिर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भुमिका घेतल्याने सुरवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ 706 जणच आपले प्राण वाचवु शकले. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण 28 °F (−2°C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला 15 मिनिटांत मृत्यू येतो. या घटनेवर आधारित 1997 साली 'टायटॅनिक' हा चित्रपट आला होता. 

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला टायटॅनिकचे अमेजिंग फॅक्ट आणि अतिशय दुर्मिळ फोटो घेऊन आलो आहोत.  
 
बातम्या आणखी आहेत...