आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'टायटॅनिक\'ची 105 वर्षांपूर्वी अवघ्या 3 तासांत संपली होती संपूर्ण कहाणी, बघा Rare Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्लॉकबस्टर 'टायटॅनिक' या सिनेमाच्या रिलीजला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. 18 नोव्हेंबर 1977 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. टायटॅनिक जहाजबुडीच्या सत्य घटनेवर या चित्रपटाचे कथानक आधारित होते. 

 

टायटॅनिक हे अतिशय विशाल असं जहाज होतं. 10 एप्रिल 1912 रोजी इंग्लंडमधील साउथहँप्टन येथून हे जहाज न्यूयॉर्क शहराकडे सफरीला निघाले होते. 4 दिवसांनी 14 एप्रिल 1912 रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या धडकेत टायटॅनिक बुडाले. एकुण 2227 प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी 1517 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले होते. हीच घटना टायटॅनिक या चित्रपटात दिग्दर्शक जेम्स कॅमरन यांनी चित्रीत केली होती.   

 

टायटॅनिक जहाजाला झालेला अपघात हा जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो. जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे दोन प्रमुख कारण होते. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील (1178) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. दुसरी बाब म्हणजे टायटॅनिक वरील बरयाच जणांना घटनेचे गांभिर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भुमिका घेतल्याने सुरवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ 706 जणच आपले प्राण वाचवु शकले. टायटॅनिक जहाज बुडाले तेव्हा पाण्याचे तापमान साधारण 28 °F (−2°C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला 15 मिनिटांत मृत्यू येतो. 

 

'टायटॅनिक' या चित्रपटाला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत आज या पॅकेजमधून आम्ही तुमच्यासाठी टायटॅनिक जहाजाचे अमेजिंग फॅक्ट आणि अतिशय दुर्मिळ फोटो घेऊन आलो आहोत...  पुढील स्लाईड्सवर वाचा, कसा होता टायटॅनिकचा प्रवास...

बातम्या आणखी आहेत...