आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात चांगला बॉयफ्रेंड पाहिलाय का तुम्ही? स्वतः मुलींनीच केले या मुलाचे कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आजकाल नोकरी आणि धावपळीच्या जगात मुले नात्याचे महत्तव जाणत नाही. पण असा एक फोटो समोर आला आहे ज्यामुळे आपला प्रेमाच्या नात्यावर पुन्हा विश्वास वाढतो. एका मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडला आराम मिळावा म्हणून एक अनोखे काम केले आहे. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडच्या पायांना आराम मिळावा म्हणून त्याची चप्पल तिला देत स्वतः तिची पिंक हिल्स घातली. हा फोटो चीनच्या एका मुलीने घेतला आहे जिचे नाव जाई आहे. पुढे वाचा, हिल्स का घातली...
 
हा फोटो चीनच्या चिंगकोंग शहरातील जिनक्याओ हॉस्पिटल येथील आहे. जिथे हा मुलगा मुलीला चेकअपसाठी घेऊन गेला होता. तिथे त्या मुलीच्या पायात हिल्समुळे त्रास होत होता त्यामुळे त्याने तिची हिल्स स्वतः घातली आणि त्याची काळी चप्पल तिला दिली. हा फोटो जाई नावाच्या मुलीने हळूच घेतला. मुलीने सांगितले की, त्या मुलाच्या गर्लफ्रेंडने त्याला सँडल वापस देण्यास सांगितले पण त्याने नकार दिला. 
 
मुलीने का क्लिक केला फोटो?
जाईने तिच्या बॉयफ्रेंडला दाखवण्यासाठी फोटो क्लिक केला. त्या मुलाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि तो व्हायरल झाला. जगभरातल्या अनेक वेबसाईटवर ही बातमी पब्लिश झाली आहे. यावर हजारो कमेंट्स आणि लाईक्स आले आहेत. काही मुलींनी तर हा मुलगा हिरो आहे असेही सांगितले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, मुलाचा अजून एक फोटो..
बातम्या आणखी आहेत...