आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: जगावर हुकूम गाजवणा-या अमेरिकेच्‍या बेटावर खतरनाक मांजराचे साम्राज्‍य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगावर आपले अधिराज्‍य गाजवणारा देश म्‍हणून अमेरिकेची ओळख आहे. मात्र या देशातील न्‍यूयॉर्कजवळच्‍या 'तोनावेन्‍डा' बेटावर फक्त मांजरांचे साम्राज्‍य पाहायला मिळते.
अमेरिकेच्‍या न्‍युयॉर्क शहराजवळ नियाग्रा नदी आहे. या नदीच्‍या बाजुला तोनावेन्‍डा नावाचे एक बेट आहे. या बेटावर बहुसंख्येने मांजरी राहतात. या मांजरांची संख्‍या हजारापेक्षा जास्‍त आहे. या बेटावर येणा-या पर्यटकांना मांजर त्रास देतात. बेटावर राहणारी डेनियला कूलीगन सांगते, या बेटावरील मांजरा खतरनाक आहेत. कधी हल्ला करतील हे सांगता येत नाही. न्युयॉर्क शहरांमधील घरांत त्रास देणा-या मांजरा येथे सोडण्‍यात आल्‍यामुळे मोठ्या प्रमाणात मांजरांचा झुंड तयार झाला आहे. या मांजरांचा त्रास वाढल्‍यामुळे 'ऑपरेशन: आयलँड कॅट' राबवण्‍यात आले, मात्र याचा फारसा परिणाम झाला नाही. आजही 'तोनावेन्‍डा' बेटावर मांजराचे साम्राज्‍य पाहायला मिळते.
पुढील स्‍लाईडवर पाहा खतरनाक मांजरांच्‍या बेटाची छायाचित्रे...