आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Most Peaceful Countries In The World 2015

जगातील या दहा देशात नांदते शांतता, सुख; दहशतवाद्यापासून कोसो दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईवर 26 नोव्‍हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्‍ला झाला. यामुळे संपूर्ण जग हादरून केले. दरम्‍यान, त्‍यापूर्वी अमेरिका आणि दोनच आठवड्यांपूर्वी फ्रान्‍सवरही दहशतवादी हल्‍ला झाला. त्‍यामुळे विकसनशीलच नव्‍हे तर प्रगत देशांवरही दहशतवादांची टांगती तलवार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे दहशतवादाची सर्वाधिक झळ बसलेले आणि अत्‍यंत कमी झळ बसलेल्‍या देशांबाबत खास माहिती...

कुणाला बसली दहशतवादाची सर्वाधिक झळ ?
या एका वर्षात सीरिया, नायजेरिया, तुर्कस्‍तान, फ्रान्‍स, भारत अशा जगातील सर्वच देशांमध्‍ये दहशतवाद्यांनी एकूण 1,80,000 लोकांचा बळी घेतली. फोर्ब्स डॉट कॉमच्‍या अहवालानुसार पाच वर्षांपूर्वी हा आकडा केवळ 49,000 एवढा होता. त्‍यामुळे जगात हिंसाचार वाढत आहे, असे मत इंस्टीट्यूट फॉर इकोनॉमिक्स अँड पीस या संस्‍थेने व्‍यक्‍त केले. ही संस्‍था वर्ष 2008 पासून दरवर्षी दहशतवाद, हिंसाचार यावर अभ्‍यास करून जगातील शांतता नांदत असलेल्‍या देशाची यादी जाहीर करते. त्‍यांच्‍या अहवालानुसार मध्‍य, पूर्व आणि उत्‍तर आफ्र‍िकेला या वर्षी दहशतवादाची सर्वाधिक झळ बसली. गृहयुद्धात होरपळत असलेल्‍या सीरियामधील अर्धी लोकसंख्‍या विस्‍थापित झाली. वर्ष 2015 मध्‍ये हिंसाचाराच्‍या बळीत हा देश क्रमांक एकवर आहे. यानंतर इराक, अफगानिस्तान, साउथ सुडानचा क्रमांक लागतो.
1. सर्वाधिक शांती असलेला देश आइसलँड
आइसलँड या देशात सर्वात कमी हिंसा असून, हा देश शांतीप्रिय आहे. वर्ष 2014 च्‍या ग्लोबल दहशतवाद निर्देशांकांतही आइसलँड 0.08 प्वाइंट्ससह 113 व्‍या स्‍थानावर आहे. यामध्‍ये इराकला 10, भारताला 8.10, अमेरिकेला 4.71 आणि इंग्‍लंडला 5.17 प्वाइंट्स दिले गेले आहेत. गत 10 वर्षांतील दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या आधारावर ही आकडेवारी प्रसिद्ध केली जाते.
धबधबा आणि फ्रोजेन पर्वतांचा देश आहे आइसलँड
साहसी लोक आणि पर्यटकांसाठी आइसलँड कायम आकर्षणाचे केंद्र राहिलेला आहे. निसर्गसंपन्‍नतेने हा देश नटलेला आहे. हा देश युरोपमध्‍ये असून, त्‍याची लोकसंख्‍या केवळ 3 लाख 29 हजार आहे. हा पूर्णपणे विकसित देश असून, जगातील सर्वाधिक श्रीमंत देशापैकी एक आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या शांतता नांदत असलेल्‍या इतर नऊ देशांबद्दल...