आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही 20 शहरे आहेत जगातील सर्वात जास्त प्रदूषित, भारताच्या 13 शहरांचा सामावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीचा फाइल फोटो
दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणाचा विषय चर्चेत आहे. या निमित्तावर आम्ही तुम्हाला अशाच 20 शहरांविषयी सांगत आहोत, जिथे दिल्लीसारखे प्रदूषण पाहायला मिळते.
नवी दिल्ली- वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशनच्या मागील वर्षी डिसेंबरमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे. परंतु रिपोर्टनुसार, यापेक्षा मोठी चिंतेची बाब अशी, की जगातील 20 सर्वात लोकप्रिय शहरांत भारताचे 13 शहर सामील आहेत. हवेत असलेल्या नाइट्रोजन डाइऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड आणि सल्फर डाइऑक्साइडसारख्या वायूंचे प्रमाण जास्त असल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.
या वायूंचे असणे जेवढे सुरक्षित मानले जाते, दिल्लीची हवा त्यापेक्षा अनेक पट जास्त धोकादायक आहे. वायूव्यतिरिक्त इतर हानिकारक कण असल्याचेसुध्दा या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
भारताशिवाय कोणते देश आहेत सामील-
20 सर्वात जास् प्रदूषित असलेल्या शहरांच्या यादीत पाकिस्तान, कतर आणि बांग्लादेश या देशातील शहरांचा सामावेश आहे. यामध्ये एक ईराणचे शहरसुध्दा सामील आहे. मात्र whoच्या एका रिपोर्टनुसार, 'सर्वात जास्त प्रदूषित देशां'मध्ये भारताचे नाव सर्वात वरती आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित देश सध्या पाकिस्तान आहे.
WHOनुसार, हवेत 2.5 मायक्रोमीटर डायमीटर (PM 2.5)पेक्षा कमी आकाराच्या सूक्ष्म जीवांची उपस्थिती प्रती क्यूबिक मीटरमध्ये 10 मायक्रोग्राम्सपेक्षा जास्त असू नये. परंतु दिल्लीमध्ये हे 153 मायक्रोग्राम्स (153 µg/m3) इतके आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही शहरांविषयी जिथे आहे सर्वाधिक प्रदूषण...
बातम्या आणखी आहेत...