आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tourist\'s Photos Show What Living In North Korea Is REALLY Like

हे PHOTOS दाखवतात जगातील सर्वात \'सीक्रेट देश\' नॉर्थ कोरियाची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूळचा जर्मनी फोटोग्राफर क्रिस्टिअन पिटरसन क्लॉसनने काढलेले नॉर्थ कोरियाच्या कोलाजचा फोटो...
सियोल- चीनमध्ये राहणा-या एका फोटोग्राफरने नॉर्थ कोरियाच्या लोकांचे फोटो कैद केले आहेत. यामधील काही छायाचित्रांत नॉर्थ कोरियाच्या लोकांना प्रवास करताना दाखवले आहे तर काही फोटोंत मुले खेळताना दिसत आहेत. काही फोटोमध्ये कपल डान्स करताना तर कुणी स्मार्टफोनवर बोलताना दिसत आहे. या फोटोग्राफरचे नाव क्रिस्टिअन पिटरसन क्लॉसन आहे. क्रिस्टिअनचा जन्म जर्मनीमध्ये झाला, परंतु सध्या तो चीनमध्ये राहत आहे.
फोटोग्राफर क्रिस्टिअनने सांगितले, की तो 15 ऑगस्टला नॉर्थ कोरियाला गेला होता. त्यानंतर तेथील विविध ठिकाणांचे फोटो कैद केले आहेत. क्रिस्टिअनने पुढे सांगितले, की मला अनेक दिवसांपासून कोरियाविषयी जाणून घ्यायचे होते. अखेर लोकांच्या नजरेत हा देश सीक्रेट कंट्री म्हणून का आहे? सोबतच हेही जाणून घ्यायचे होते, की नॉर्थ आणि दक्षिण कोरिया बनल्यानंतर या देशावर काय प्रभाव पडला आहे. त्याने सांगितले, की मला वाटले होते, की येथे फोनवरसुध्दा बंदी असेल. परंतु असे नाहीये. येथील लोकसुध्दा स्मार्टफोन वापरतात. मात्र ते इतर देशांत फोनवरून बातचीत करत नाहीत. त्यांना त्यासाठी चीन किंवा दक्षिण कोरियाचे सिम घ्यावे लागते. फोटोग्राफरने पुढे सांगितले, की अनेक ठिकाणी हुकूमशाहीचे सरकार असल्याचे चित्र दिसते.
नॉर्थ कोरिया दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसोबतच्या वादाने चर्चेत असतो. हुकूमशाही असलेल्या देशाला अनेक रिपोर्टमध्ये न सुटणारे कोडे आणि सर्वात सिक्रेट देशसुध्दा म्हटले जाते. तेथील हुकूमशाही सरकार प्रयत्न करत असते, की देशाचा खरा चेहरा बाहेर दिसून नये आणि आलाच तर त्याचे खोटे रुप दिसावे. तरीदेखील क्रिस्टियनने या देशातील शानदार क्लिक केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फोटोग्राफर क्रिस्टिअनने क्लिक केलेली खास छायाचित्रे...