आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरेच्‍या नावावर या विधवांच्‍या नशिबी आल्‍या नरकयातना, जगावे लागते असे जीवन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात सती प्रथेचा खूप पूर्वी अंत झालेला असला तरी आजही पतीच्‍या मृत्‍यूनंतर विधवा महिलांना मनसोक्त जगता येत नाही. काही महिलांना तर पतीच्‍या मृत्‍यू नंतर सासरहून हाकलून दिले जाते. अशा महिला उदरनिर्वाहासाठी रस्‍त्‍यावर भीक मागतात तर काही विधवा आश्रमात जातात. विधवांच्या या नरकासमान जीवनाबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. 

मरेपर्यंत नरकयातना यातना 
2005 नोबेल पीस प्राइजसाठी नामांकित मोहिनी गिरीया महिलांच्‍या अधिकारासाठी नेहमी लढत असतात. UN च्या एका उपक्रमातून त्यांनी विधवांच्‍या समस्‍या समोर आणल्या. विधवा होणे भारतात उच्‍च्‍वर्गीय महिलांसाठीही मृत्‍यू समान असल्याचे त्या एकदा म्हणाल्या होत्या. अनेकदा पतीच्‍या निधनासाठी महिलांनाच जबाबदार मानले जाते. सती प्रथा संपली असली तरी विधवांच्गेया नरकयातना कायम आहेत. 
 
कांदा, लसूण, बटाटे आणि मासे खाण्यास विरोध 
भारतात विधवांना कांदा, लसूण, बटाटे आणि मासे खाण्‍याला विरोध केला जातो. त्यायाचे कारणही चकित करणारे आहे. हे पदार्थ खाल्ल्यामुळे महिलांमध्‍ये उत्‍तेजना निर्माण होते असे म्हटले जाते. पतीच्‍या मृत्‍यूनंतर असे विचार मनात येणे हे पाप मानले जाते. त्यामुळे त्‍यांना यापासून दूर ठेवले जाते. 
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आणखी कोणत्‍या नरक यातना भोगाव्‍या लागतात विधवांना..
बातम्या आणखी आहेत...