आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Training To Children For Olympic And All Plays In China

चीनमध्ये मुलांना असे दिले जाते क्रीडा प्रशिक्षण, पाहा अंगावर शहारे आणणारे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 वर्षांची दीपा कर्माकर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली आहे. 52 वर्षांत प्रथमच भारतीयाने ऑलिम्पिक जिम्नॅस्टसाठी पात्रता मिळवली आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आपले शेजारी राष्‍ट्र चीनमधील ऑलिम्पिकपूर्व प्रशिक्षणाविषयी....
चीन नेहमी ऑलंम्पिकमध्ये चांगले प्रदर्शन करण्यासाठी ओळखला जातो. दरवर्षी त्यांच्या पदरी एकतरी सुवर्णपदक पडावे याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. परंतु यासाठी चीनच्या खेळाडूंनी लहानपणापासून किती मेहनत घ्यावी लागते याचा अंदाजा कुणालाही नसेल. यांच्या खेळाच्या, व्यायामाच्या प्रशिक्षणाविषयी कळाल्यास अंगावर शहारे उभे राहतील. येथे खेळाडूंना लहानपणापासूनच हार्ड ट्रेनिंग दिले जाते.
स्पिरिट वाढण्यासाठी चिमुकल्यांना बालपणीपासूनच तयार केले जाते. असेच प्रशिक्षण आर्मीत भरती होतानासुध्दा दिले जात नाही. या मुलांची लवचिकता वाढवण्यासाठी त्यांना प्रत्येक व्यायाम आणि योगा शिकवला जातो.
एवढेच नव्हे, मुलांच्या खाण्या-पिण्यापासून, त्यांच्या वागणूक आणि शरीराच्या लवचिकतेकडे बारकाईने लक्ष दिले जाते. त्यांना लवचिकता वाढवण्यासाठी खास प्रसिक्षण दिले जाते. आम्ही जी छायाचित्रे आज तुम्हाला दाखवत आहोत, ती याची मोठी उदाहरणे आहेत. ओलम्पिकसारख्या अंतरराष्ट्रीय खेळांमध्ये देशाचे नाव उंचावण्यासाठी या मुलांना आणि खेळाडूंना कसे-कसे प्रशिक्षण दिले, हेदेखील या छायाचित्रांतून दिसते.
या मुलांना मात्र खूप याचा त्रास सहन करावा लागतो, काहींच्या वेदना पाहून आपल्याही अंगाला काटा उभा राहतो.