जगभरात अनेक चित्र-विचित्र परंपरा आहेत, ज्या माहिती झाल्यास अंगावर शहारे येतील. अशीच एक विचित्र परंपरा इंडोनेशियाच्या दक्षिण सुलावेसी प्रांताच्या ताना तोराजामध्ये आहे. या परंपरेत येथे मृत पावणा-या लहान मुलांना जमीनीत नव्हे एका झाडात पुरले जाते. हा परंपरेला पाळणा-या लोकांचे म्हणणे आहे, की असे केल्याने मुले मृत्यूनंतर निसर्गाच्या कुशीत जातात.
मुलांचे शरीर दफन करण्यासाठी झाडाच्या खोडाला खोदले जाते. त्यानंतर कपड्याला मृत मुलाला गुंडाळून खजुरीच्या झाडापासून बनलेल्या फायबरमध्ये झाकले जाते. वेळे जशी जाते तसे हे खड्डेसुध्दा भरतात. लोकांचे मानने आहे, की मुलांची आत्मा हवा आपल्यासोबत घेऊ जाते. ही परंपरा केवळ दात निघण्यापूर्वी मृत पावलेल्या मुलांसाठी आहे. वयस्कर किंवा तरुणांना जमिनीत पुरले जाते.
मृतदेहाला घालतात नवीन कपडे-
मुलांच्या मृतदेहाला दफन करण्यापूर्वी या गावात आणखी एक परंपरा वयस्कर लोकांसाठीसुध्दा आहे. यामध्ये मृत लोकांचे वंशज कब्रमधून आपल्या पूर्वजांचा मृतदेह बाहेर काढतात. त्यानंतर त्यांना नवीन कपडे घालून संपूर्ण गावात फिरवतात. असे प्रत्येक तीन वर्षांनी केले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या गावातील विचित्र परंपरेचे फोटो...