आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र प्रथा: कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मृत्यूनंतर कापली जातात हाताची बोटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- दानी समाजाचे लोक)
प्रथा-परंपरा कितीही मोडित काढल्या तरी त्या संपूर्ण नष्ट होणे शक्य नसते. जादूटोणा, तंत्रमंत्र, नरबळी देणे अशा अंधश्रध्दा घडताना आजही समाजात आपण पाहतो. असाच एक समाज इंडोनेशियामधील पापुआ आहे. पापुआमध्ये असलेल्या दानी समाजातील लोकांमध्ये एक भयावह प्रथा आहे. या समाजात कुंटूब प्रमुखाच्या निधनानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे बोट कापले जातात. पुरुष आणि मुलांच्या हाताचीत बोटे धारदार हत्याराने कापली जातात. नंतर त्यांच्या चेह-यावर माती आणि राख फासली जाते. कुटुंबातील सदस्यांनी आपली बोटे कापल्यास मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते, असे या समाजातील लोकांचा समज आहे.
सरकारने या प्रथेवर बंदी आणली होती, तरीदेखील दानी जातीच्या या लोकांनी या प्रथेला चालू ठेवले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दानी जातीच्या लोकांची छायाचित्रे...