आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे आहे जर्मनीतील हे ठिकाण, मधील नजारा पाहून बसणार नाही विश्वास...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधीकाळी हे ठिकाण विमान उभे करण्यासाठी वापरण्यात येत होते. येथे विमानाचे पार्ट जोडून त्यांचे मेंटेनंन्स करण्यात येते होते. आता हि जागा बाहेरून पाहिल्यास एखाद्या टेक्निकल कंपणीप्रमाणे दिसते. पंरतु, या शेडच्या आत जाणारा कोणीही आतील नजारा पाहून अजंबित झाल्याशिवाय राहात नाही. जर्मनीच्या ब्रांडेनगबर्ग स्थित या जागेने आता एका वैशिष्यपुर्ण रिसॉर्टचे रूप धारण केले आहे. येथे बांन्डेबर्गसारख्या थंड शहरातील लोकांना गर्मीचा अनुभव देण्यात येतो...

काय आहे वैशिष्ये....?
ट्रॉपिकल आयलॅन्ड रिसॉर्ट असे याचे नाव आहे. जर्मनीच्या ब्रान्डेनबर्ग शहरात थंडीच्या दिवसांत मायनस 1°C तापमान असते. तेथील सामान्य तापमान 18°C आहे, त्यामुळे या रिसॉर्टच्या आतिल तापमान 25°C ठेवण्यात आले आहे. हे तापणान येथील लोकांना गर्मीचा अनुभव देते. यामुळे येथील लोक अत्यंत सामान्यपणे स्विमिंग कॉस्ट्यूम घालून पुलात पोहण्याचा आनंद लुटतात. मलेशियन कॉर्पोरेशनने ही जागा 2003 मध्ये खरेदी केली होती. त्यानंतर ती डेव्हलप करून तेथे हे रिसॉर्ट उभारण्यात आले. तेथे गेल्यानंतर विश्वासच बसत नाही की, ही जागा जर्मनीच्या ब्रान्डेनबर्ग नावाच्या थंड शहरातील आहे. विकेंड साजरा करण्यासाठी लोक येथे आवर्जून येतात. याच रिसॉर्टमध्ये जगातील सर्वात मोठा इनडोअर रेनफॉरेस्ट देखील आहे.

पुढील स्लाइडवर पाहा रिसॉर्टमधील दृष्य...
बातम्या आणखी आहेत...