आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक फोटो काढून ओळखता येईल शरीराचा आजार, अशी असते फोटोग्राफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही अशी फोटोग्राफी आहे, ज्यासाठी लेन्स आणि कॅमेराची गरज पडत नाही. परंतु यामुळे तुमच्या शरीरातील ऑरा दिसतात. याला प्रभामंडळ असेही म्हणतात. प्रत्येक गोष्टीतून एक विशेष ऊर्जा निघते असे मानले जाते. मनुष्य, प्राणी, झाडे-झुडूपांसारख्या सजीवांसोबत नाणे, पेन सारख्या निर्जीव वस्तूंमधूनही एनर्जी निघते. या एनर्जाल कॅप्चर करण्याला किर्लियन फोटोग्राफी म्हणतात. जाणुन घ्या याचे महत्त्व...

- किर्लियन फोटोग्राफीचे संशोधन संयोगाने झाले होते. 1939 मध्ये रुसी इलेक्ट्रिकल इंजीनियर सेमलॉन किर्लियन आणि त्यांच्या पत्नीने एका हॉस्पिटलमध्ये ऑब्जर्वेशनच्या काळात अशा प्रकारच्या चित्राविषयी त्यांना शोध लागला.
- यानुसार फोटोग्राफिक प्लेटवर एखादा ऑब्जेट जेव्हा हाय व्होल्टेज सोर्सच्या संपर्कात येतो तेव्हा फोटोग्राफिक प्लेवर त्याची इमेज दिसते. असे मानले जाते की, हे ऑरा म्हणजेच प्रभामंडळ आहे, हे प्राण ऊर्जा व्यक्त करते.
- विशेषज्ञ मानतात की, ऑरा प्राणकोषातून निघते. शरीरात कोणताही रोग प्राण कोषातूनच सुरु होतो. शरीरात कोणत्याही रोगाचे लक्षण दिसण्यापुर्वी त्याची सुरुवात प्राण कोषातूनच सुरु झालेली असते. यामुळेच विशेषज्ञ दावा करतात की, किर्लियन फोटोग्राफच्या एनलासिसवरुन रोग होण्यापुर्वीच माहिती मिळू शकते. आपण बचावाचे उपाय करु शकतो.
- किर्लियन फोटोग्राफी संबंधित रिसर्च पॅरासायकोलॉजी अंतर्गत केली जाऊ शकते. स्थापित विज्ञानाचे विशेषज्ञ याला स्यूडो सायन्स म्हणजेच छद्म विज्ञान म्हणतात आणि याच्या निष्कर्षांना मान्यता देत नाही. तरीही अध्यात्मवादी, रहस्यवादी आणि मानवाच्या सुप्रानेचुरल शक्तींवर विश्वास ठेवणा-या लोकांसाठी हा आकर्षणाचा विषय आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या किर्लियन फोटोग्राफीचे काही नमुने...
बातम्या आणखी आहेत...