आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Turkish Man Welcomes 32nd Child As Four Wives Await Social Aid

Pics: 4 बायका आणि 32 मुले, तरीही 50 मुले जन्माला घालण्याची इच्छा आहे या बहाद्दराची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलांसोबत तुर्कीत राहाणारा हालित तकीन)

अंकारा -
तुर्कीच्या दक्षिण भागात राहाणार्‍या एका व्यक्तीची चक्क 50 मुले जन्माला घालण्याची इच्छा आहे. सध्या त्याचे वय 54 वर्षे इतके असून त्याला चार बायका असून त्यांच्याकडून त्यास 32 मुले आहेत. मात्र हालित तकीन नाव असलेला या व्यक्तीच्या इच्छेच्या आड कायदा आला आहे. कारण तुर्कीमध्ये जास्त व्यक्तींशी लग्न करणे बेकायदेशी आहे.

हुर्रियत डेली न्यूजनुसार हालितने तुर्कीच्या कायद्याचे उल्लंघन करत एका अधिकृत लग्नानंतर लपून तिन लग्न केले आहेत, यामुळे त्याच्या मुलांची संख्या 32 पर्यंत पोहचू शकली आहे. हालितने त्याच्या 50 मुले जन्माला घालण्याच्या इच्छेबाबत तेव्हा सांगितले, जेव्हा नुकतेच त्याच्या पहिल्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला.
हालितने या मुलाचे नाव अहमत असे ठेवले आहे. या नवजात मुलालाधरून हालितच्या मुलांची संख्या आता 32 वर पोहोचली आहे. यामध्ये 12 मुले आहेत. मात्र अजूनही हालितची इच्छा 50 मुलांचीच आहे. हालितच्या या विशाल कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या या सर्व पत्नी वेगवेगळ्या घरांमध्ये राहातात, कारण सर्वांना एकाच घरात राहाणे शक्य नाही. मात्र त्याचे कुटुंब मिळून मिसळून राहिल याची हालितला खात्री आहे.
बेकायदेशीर आहे असे करणे
तुर्कीमध्ये एकापेक्षा जास्त लग्न करणे बेकायदेशीर आहे. शिवाय 2013 मध्ये तेथील संसदेकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार तेथे 3 लाख 72 हजार लोकांनी एकापेक्षा जास्त लग्न केली आहेत. हा कायदा असूनही तुर्कीचे राष्ट्रपती रेकेप तैय्यब एर्दोगन जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी तुर्कीच्या लोकांना कमी मुलांना जन्म द्या आणि कुटुंब छोटे ठेवा याबद्दलचे आवाहन केले होते.
पुढील स्लाईडवर पाहा, हालितच्या कुटुंबाचे फोटो...