आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कोब्राच्या पिलाला आहेत दोन शिर, आपलेच डोके गिळण्याचा करतो प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील असे चित्रविचित्र प्रकरण समोर येतात, की आपल्याला हैराण करुन सोडतात. चीनच्या यूलिन शहरातील स्नेक फार्ममधील असेच एक प्रकरण समोर आले आहे. या फार्ममध्ये काही दिवसांपूर्वी दोन तोंड असलेल्या कोब्रा सापाने जन्म घेतला. त्याची प्रकृती पूर्णपणे चांगली आहे. अशा प्रकारच्या जिवांचे आयुष्य कमी असते, असे सांगितले जाते. पण हा साप चांगल्या अवस्थेत आहे.
चीनमध्ये विषारी सापांना पाळले जाते. यासाठी लोकांनी काही ठिकाणी फार्म तयार केले आहेत. या सापांच्या चामड्यापासून बॅग तयार केल्या जातात. सापाचे मांस चिनी लोकांना खुप आवडते. वैद्यकिय गुणधर्म असल्याने औषधांमध्ये मांसाचा वापर केला जातो.
यूलिनमधील स्नेक ब्रिडर मिस्टर हॉंग यांनी सांगितले, की दहा दिवसांपूर्वी माझ्या फार्ममध्ये दोन तोंड असलेला साप जन्मायला आला आहे. त्याची निरंतर वाढ होत आहे.
हॉंग यांनी सांगितले, की सुरवातीला हा साप काहीच खात नव्हता. हा साप जिवंत राहणार नाही असे वाटत होते. पण आता तो जेवण घेत आहे. त्याचे दोन तोंड वेगवेगळ्या दिशांमध्ये आहेत. दोन्ही तोंड एकमेकांना गिळण्याचा प्रयत्न करतात.
पुढील स्लाईडवर बघा, दोन तोंड असलेल्या सापाचे आणखी फोटो....