आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UAE Youth Posted Photos With Lioness On Social Media Account

PHOTOS: सिंहिण, चीता आणि महागड्या कार, असे आलिशान आयुष्य जगतो हा तरुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबूधाबी (संयुक्त अरब अमिराती)- येथील एका तरुणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तो अत्यंत हटके अंदाजात आयुष्य जगतोय. हुमैद अल्बुकॅश असे याचे नाव आहे. त्याच्याकडे अनेक सिंहिण, चीते आणि महागड्या कार आहेत. सिंहिणींसोबत वेगवेगळ्या पोजमध्ये काढलेले फोटो त्याने सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केले आहेत.
स्टेट्स सिम्बॉलसाठी करतो असे...
वन्यप्राणी पाळणे हा त्याचा व्यवसाय आहे, की स्टेट्स सिम्बॉल हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. संयुक्त अरब अमिराती या देशात असे वन्यप्राणी पाळणे ही अगदी सामान्य बाब आहे. बऱ्याच फोटोंमध्ये तो या प्राण्यांसोबत दिसतो. त्याच्याकडे मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी यासारख्या महागड्या कारही आहेत.
फोटोंवर प्रतिक्रियांचा पाऊस
सोशल मीडिया साईट्सवर त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर अनेक प्रकारच्या कॉमेंट्स आल्या आहेत. काहींनी याचा अॅनिमल अब्युज असे म्हटले आहे. काहींनी त्याच्या हिंमतीचे कौतुक केले आहे. तर काहींनी हा मुर्खपणा असल्याचे म्हटले आहे. अरबमध्ये एका सिंहाची किंमत सुमारे 33 लाख रुपये आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सिंहिणींसोबत हा तरुण कशी करतो मस्ती....