जगात वियर्ड रेस्तरॉची कमी नाहीये. विविध थीमवर तयार झालेले रेस्तरॉ
आपल्या वैशिष्ट्याने ओळखले जातात. अनेक रेस्तरॉ असेही आहेत, ज्यांच्याविषयी ऐकूनच आश्चर्य वाटते. वरील छायाचित्र पाहून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. कारण हे पोलिस स्टेशन नसून एक रेस्तरॉ आहे. हे रेस्तरॉ आपल्या वेगळ्या थीममुळे जगभरात प्रसिध्द आहे. चेन्नईच्या मायलापोरमधील या रेस्तरॉचे नाव कैदी किचन आहे.
या रेस्तरॉमध्ये पोलिसांच्या वेशभूषेत दिसणारे वेटर जेवणाची ऑर्डर घेतात आणि वाढण्याचे काम कैदी करतात. येथील डायनिंग टेबलसुध्दा पोलिस स्टेशनमधील टेबल आणि खुर्चीप्रमाणे आहेत. या रेस्तरॉमध्ये प्रवेश करताच तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये आल्याचा भास होतो. येथील वैशिष्ट असे, की रेस्तरॉमध्ये केवळ शाकाहारी पदार्थ मिळतात. या रेस्तरॉचा उद्देश लोकांना कायद्याचे पालन आणि कायदा शिकवण्याचा आहे.
कैदी किचनचे संचालक रोहित ओझा म्हणतात, की आम्हाला ग्राहकांना एक वेगळे वातावरण द्यायचे आहे. हा हेतू समोर ठेऊन आम्ही कैदी किचन तयार केले. कैदी किचन 8000 स्क्वेअर फुटमध्ये पसरलेले आहे. येथे 8 तुरुंग बनवण्यात आले आहे. या तुरुंगात ग्राहकांना बंद करून जेवण दिले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कैदी किचन रेस्तरॉमधील काही अनोखी छायाचित्रे...