आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unique: Shooters Grill Is A Gun Themed Restaurant In Colorado

PHOTOS: जरा विचित्रच आहे हे रेस्तरॉ, येथे प्रत्येकाच्या खिशात असते \'बंदूक\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शूटर ग्रिल रेस्तरॉ)
एखाद्यावर बंदूकीचा निशाणा ठेवला तर त्याचा हात-पाय थरथर कापायला लागतात. बंदूकीच्या दहशतीत जगण्याची इच्छा कुणालाच निर्माण होत नाही. परंतु अमेरिकेमध्ये बंदूकीसोबत राहणे किंवा जगणे एक संस्कृतीच बनली आहे. येथील लोक बंदूकीला आपला आधार समजतात. हे लक्षात घेऊन अमेरिकेच्या कोलोराडोमध्ये बंदूकीच्या थीमवर एक रेस्तरॉ सुरु करण्यात आले आहे. या चिवत्र-विचित्र रेस्तरॉला लोकांनीसुध्दा पसंती दिली आहे.
कोलोरिडोमध्ये स्थित 'शूटर ग्रिल' नावाच्या या रेस्तरॉमध्ये चौहुबाजूंनी बंदूक लटकलेल्या आहेत. तसेच, जेवण बनवणे आणि वाढून देणारे लोकसुध्दा आपल्या सोबत बंदूक ठेवतात. या रेस्तरॉमध्ये हत्यार सोबत ठेवणारे आणि सोबत घेऊन फिरणा-या लोकांना प्रोत्साहित केले जाते. या रेस्तरॉच्या प्रवेश व्दारावर अशाप्रकारचे वेलकम नोट लावलेली आहे.
चित्र-विचित्र आहे डिशेसचे नाव-
बंदूकीच्या थीमवर तयार झालेल्या या रेस्तरॉच्या आत डिशेसची नावेसुध्दा विचित्र आहेत. यामधील काही डिशेसचे नाव 'एम-16 बुरिट्टो' आहे तर काहींचे नाव 'लॉक्ड अँड लोडेड नाचोज' आहे. रेस्तरॉची मालिकीन लॉरेन बोएबर्ट आणि तिचा पती आहे.
कोलोराडोमध्ये बंदूक सोबत घेऊन फिरणे कायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही आमच्या रेस्तरॉची थीम बंदूक ठेवली. लोकांना या थीमला खूप पसंत केले. येत्या काळात आम्ही आमचे काही रेस्तरॉ कोलोराडोच्या बाहेर चालू करण्याची योजना करत आहोत, असे रेस्तरॉची मालकीन लॉरेनने सांगितले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या चित्र-विचित्र रेस्तरॉची छायाचित्रे...