आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unwed Woman Breaks Taboo, Roams Cairo's Streets In Wedding Dress

जगाला प्रेरणा देणारी महिला, अविवाहीत असूनही फिरते नववधूच्‍या वेशात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इजिप्तची समाह हमदीने (27) अजब पद्धत वापरून लोकांना त्यांचा दृष्टिकोनच बदलण्यासाठी प्रवृत्त केले आहे. तिने एक व्हिडिओ तयार केला आहे. यामध्‍ये ती वधूच्या वेशात ती काहिरामध्ये फिरताना दाखवण्यात आले आहे. एकट्या-दुकट्या महिलेकडे कोणी लक्ष देत नाही. असा तिचा आरोप आहे. तिला समाजात वावरत असताना तिला जे अनुभव आले, ते तिने फेसबुकवर अपलोड केले आहेत.
समाह सांगते, जर तुम्ही तरुण असाल आणि एकट्या राहत असाल तर नोकरी मिळणे कठीण आहे. जर तुमचे लग्न झालेले नसेल, नातेवाईक नसतील तर दुसरे कोणी तुम्हाला सहकार्य करणार नाही. तिच्या या पोस्टला जगभरातून समर्थन मिळाले. अनेक युजर्सनी तिला प्रेरणादायी, ऊर्जा देणारी आणि धीट मुलगी म्हटले आहे. एका युजरने तर लिहिले होते की, तू वर्षानुवर्षापासून असलेली जुनी परंपरा तोडलीस. जगाला अशा लाखो समाहची गरज आहे. काही युजर्सनी समाहच्या वागण्यास विरोध केला आहे.
समाहने यावर म्हटले, यामुळे काहीही फरक पडत नाही. लोकांचा दृष्टिकोनच बदलायला हवा. ती म्हणते, प्रत्येक स्त्रीने लग्नच केले पाहिजे असे नाही. जर तिला स्वत:ला काही बनायचे असेल, तर सामाजिक कुप्रथा आड येण्याची गरज नाही. इजिप्तमध्ये 90 लाख लोक अविवाहित असून त्यांचे वय 33 वर्षे इतके आहे. यात अर्ध्याहून अधिक महिला आहेत.
सोर्स- facebook.com
पुढील स्‍लाईडवर पाहा या महिलेची छायाचित्रे...