आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराब गाडी गॅरेजमध्ये घेऊन गेला पोलिस अधिकारी, आतमध्ये सापडले हे जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाडीत हिरवा पालापाचोळा आणि त्यावर केलेले घरटे पाहून मॅकेनिकला आश्चर्य वाटले. - Divya Marathi
गाडीत हिरवा पालापाचोळा आणि त्यावर केलेले घरटे पाहून मॅकेनिकला आश्चर्य वाटले.
अमेरिकेच्या इलिनॉइस येथील एका पोलिस अधिकाऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. येथे  कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी मॅक हेनरी काऊंटी शेरीफची आहे. ते कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची भरती करतात. त्यांच्या एका अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करता त्याच्यासोबत घडलेला एक प्रसंग शेअर केला होता. 
 
नादुरुस्त गाडीतून निघाले हे जीव...
- या अनामिक पोलिस अधिकाऱ्याला जी गाडी मिळाली होती त्यातून अजब-गजब आवाज येत होते. काही दिवसांतच गाडीचे हेडलाइट खराब झाले.  
- जेव्हा ऑफिसरने गाडी दुरुस्तीसाठी नेली तेव्हा मॅकेनिकने पाहिले की आतील वायर कुरतडलेले होते. त्याला वाटले उंदरांनी हे काम केले असेल. 
- तो वायर दुरुस्त करत असताना अचानक त्याची नजर गाडीत असलेल्या हिरव्या पाल्यावर पडली. त्याने गाडी खोलून जेव्हा त्यात डोकावून पाहिले तर तिथे खारीची चार पिले होती. 
- खारीने तिथे आपले घरटे तयार केले होते. मॅकेनिकने याची माहिती गाडी मालकाला दिली आणि अतिशय काळजीपूर्वक घरटे बाहेर काढून ठेवले. त्यानंतर त्याने गाडी दुरुस्त केली. 
- पोलिस अधिकाऱ्याने त्या पिलांसह खारीचे घरटे घरी आणले. तिथे त्यांची आई वाट पाहात होती. 
- या घटनेचे फोटो मॅक हेनरी काऊंटी शेरिफच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आली आहे. येथे अनेकांनी कार मॅकेनिक आणि पोलिस अधिकाऱ्याचे कौतूक केले आहे. 
 
पाहा या घटनेचे आणखी काही फोटोज्... 
बातम्या आणखी आहेत...