आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडवर झोपून राहण्याचे मिळतील 11 लाख रु, 70 दिवस असेच राहावे लागेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशिंगटन- विचार करा 70 दिवसांत तुम्हाला बेड रेस्ट करण्यास सांगितले आणि त्याबदल्यात तुम्हाला 11.25 लाख रुपये (18 हजार डॉलर) मिळणार असेल तर? ऐकून आश्चर्य वाटेल ना. परंतु असे खरंच घडले आहे. मायक्रोग्रॅव्हिटीवर दिर्घकाळ राहणा-या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी 'बेड रेस्ट' हे संशोधन डिझाइन करण्यात आले आहे. याअंतर्गत स्पर्धकांना 70 दिवस बेडवर झोपावे लागेल. अर्थातच हॉरिजोंटल अवस्थेत पूर्ण वेळ घालवावा लागेल.
या स्टडीमध्ये वैज्ञानिक अॅस्ट्रोनॉट्ससाठी शून्य गुरुत्वाकर्षणच्या स्थितीत मांसपेशी, हृदय आणि हाडांचे काम पाहून कोणता व्यायाम योग्य असेल, हे पाहिले जाणार आहे. स्पर्धकांना 'बेड रेस्ट' सुविधांमध्ये सुरुवातीचे दोन-तीन आठवड्यांपर्यंत थोडे कंटाळवाणे वाटेल. एकूणच 10 आठवडे त्यांना बेडवर झोपूनच घालावे लागेल.
यादरम्यान ते डोके खाली करून पायाला वर उचलून शरीराला थोडे मागे आणि फिरवू शकता. अंघोळीसाठी आणि स्वत:ला स्वच्छ करण्यासाठी प्लास्टिक बेडपान आणि हाताने चालणारे शॉवर असेल. तेसुध्दा हॉरिजोंटल स्थितीतच असेल. यादरम्यान झोपून राहणा-या स्पर्धकांच्या पृष्ठभाग आणि घशाला होणा-या त्रासाचासुध्दा शोध लावला जाईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या झोपून आणखी काय-काय करावे लागेल...