आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • USB Sticks Buried In Walls Make Up An Anonymous File Sharing Network

भिंतीमध्ये USB, असे बनले सर्वात मोठे ऑफलाइन फाइल शेअरिंग नेटवर्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भिंतीमध्ये लावलेला यूएसबी)
जर्मन मीडिया आर्टिस्ट एरम बार्थोल प्रोजेक्ट 'डीड ड्रॉप्स'वर काम करत आहेत. त्याने ऑक्टोबर 2010मध्ये याची सुरुवात केली होती. आज हा प्रोजेक्ट जगभरात 1218 लोकेशन्सवर पोहोचला आहे. या प्रोजेक्टमध्ये फ्लॅश ड्राइव्हला भिंतीमध्ये लावून यूजर्स फाइल अपलोड करू शकता किंवा कॉपी करू शकतात. या ड्राइव्हमध्ये अशा गोष्टी शेअर केल्या जातात ज्या नेटवर्कमध्ये सामील करायच्या आहेत.
एरम म्हणतो, हे एक ऑफलाइन नेटवर्क आहे, ज्याचा वापर लॅपटॉप, टॅब्लेट किंवा स्मार्टफोनने केला जाऊ शकतो. त्याने सोशल मीडियावर प्रोजेक्टची काही छायाचित्रे अपलोड केली आहेत. यामध्ये न्यूयॉर्क शहरातील भिंतीवर लावलेले ड्राइव्हची छायाचित्रे आहेत. सुरुवात 64 एमबी स्पेसने झाली होती आणि आता 128 एमबीपर्यंत (सिडनी) पोहोचली आहे.
लोक याला स्पाय प्रोजेक्ट म्हणतात. यावर एरम सांगतो, की इंटरनेटसुध्दा असेच आहे. आपण काय करत आहोत, हे सिस्टीम आणि सरकारला ठाऊक असते. या ऑफलाइन प्रोजेक्टमध्ये कोणाला काही माहित होत नाही, आपण काय शेअर करतोय किंवा काय कॉपी करतोय. यामध्ये यूजर्स गाणे, फोटो, पेंटीग्स, व्हिडिओ, टीव्ही शो, गमे, कॉमिक आणि जोक्ससारख्या अनेक गोष्टी अपलोड किंवा शेअर करू शकतो. डीड ड्रॉपचा डाटाबेससुध्दा, यामध्ये यूएसबी फ्लॅश ड्राइव्हच्या लोकेशनची माहिती मिळते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या प्रोजेक्टची काही छायाचित्रे...
सोर्स- computerworld.com