आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियातील सर्वात जुने शहर आहे वाराणसी, पाहा येथील दुर्मिळ छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्राचीन वाराणसीचे छायाचित्र)
शहरे वसण्याबाबत आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे वाराणसी हे आशिया खंडातील सर्वात जुने शहर असल्याचे म्हटले जाते. यात लोकांच्या रहिवासाचे प्रमाण 3000 वर्षांपेक्षाही जुने आहेत. काहींच्या मते, हे शहर जवळपास 4000 वर्षे तर काहींच्या मते 5000 वर्षे जुने आहे.
वाराणसीला 'बनारस' आणि 'काशी' या नावानेसुद्धा ओळखले जाते. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र शहर म्हणून या शहराची गणना होते. वाराणसीच्या संस्कृतीचे गंगा नदी आणि येथील धार्मिक महत्त्वाशी अतूट नाते आहे.
कसे पडले वाराणसी नाव...
वाराणसी हे नाव येथील वरुणा आणि असी या दोन स्थानिक नद्यांच्या नावावरुन पडले आहे. या दोन्ही नद्या गंगा नदीत क्रमशः उत्तर आणि दक्षिणेतून येऊन मिळतात.
महादेवाने वसवले वाराणसी शहर...
पौराणिक कथांनुसार, काशी नगरची स्थापना भगवान शिवने जवळपास पाच वर्षांपूर्वी केली होती. त्यामुळे हे एक महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. स्कन्द पुराण, रामायण, महाभारत आणि प्राचिन वेद ऋग्वेदसह अनेक हिंदू ग्रंथांमध्ये या नगरचा उल्लेख केला जातो.
ही शहरेसुद्धा आहेत सर्वात प्राचीन...
उज्जैनला आशियातील तिसरे सर्वात जुने शहर म्हटले जाते. हे शहर 2800 वर्षांपेक्षाही आधी वसवण्यात आले होते. याशिवाय जगातील सर्वात जुने शहर पॅलेस्टाइनमधील जेरिको असल्याचे म्हटले जाते. पुराव्यानुसार, येथे 11000 वर्षांपूर्वी लोकवस्ती होती. जॉर्डन नदीच्या किनार्‍यावर आढळून आलेल्या या प्राचीन शहराच्या ठिकाणी सध्या 20 हजार लोकसंख्या असलेले एक गाव आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा वाराणसी शहराची ही दुर्मिळ छायाचित्रे...