(सिंहांनी वेढलेला साळींदर)
असे म्हणतात जंगलाचा राजा सिंह आहे, मात्र त्यालाही काही वेळेस माघार घ्यावी लागते. हे गोष्ट खरी करून दाखवली आहेत या साळींदराने. दक्षिण अफ्रीकेच्या जगप्रसिध्द क्रुगर नॅशनल पार्कमधील प्रायव्हेट लोन्दोलोजी गेम रिजर्व्ह येथे रात्री एकटे फिरत असताना या साळींदराला तब्बल 17 सिंहांनी घेरा घातला. सुरवातीला त्यांच्यासाठी हे साळींदर नाश्त्यापेक्षा कमीच होते. मात्र त्यांच्या महुशारीची सिंहांना जाण नव्हती.
17 सिंहांनी वेढलेले असतानाही या साळींदराने हिम्मत नाही हारली. त्याने चालाखीने
आपल्या काटेरी केसांचा अशाप्रकारे वापर केला की त्या सर्व 17 सिहांना खालीपेट परतावे लागले. साळींदराचे स्वसंरक्षण आणि 17 सिंहांनी त्याच्यावर केलेला हल्ला याचा संपुर्ण व्हिडीओ युट्यूबवर लोन्दोलोजी गेम रिजर्वच्या टीमने अपलोड केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 17 लाख 45 हजारांपेक्षा जास्त पेजव्ह्यू मिळाले आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, या घटनाक्रमाचे सर्व फोटो आणि शेवटच्या स्लाईडवर व्हिडीओ...
सोर्स- youtube.com