आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DISTURBING VIDEO: जिवंत कोब्रा कापून चाखतात रक्त, खातात हृदय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हटले जाते, की सापाने चावा घेतला तर माणूस पाणीही मागत नाही. त्यामुळेच सापाची लोकांमध्ये खुप दहशत असते. तरीही काही भागांमध्ये विषारी साप मारुन खाण्याची परंपरा आहे. असाच एक देश आहे व्हिएतनाम. येथील अनेक रेस्तरॉंत कोब्रापासून तयार केलेल्या डिशेस मिळतात. त्यांना लोकांची पसंतीही लाभते.
एवढेच नव्हे तर व्हिएतनामचे लोक कोब्राचे रक्त पितात आणि हृदय खातात. या डिशेस खाण्यामागे लोकांचा अजब तर्क आहेत. साप खाल्ल्याने प्रकृती ठणठणीत राहते, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. त्वचा चांगली राहण्यासाठी येथील महिलाही सापाचे रक्त प्राशन करतात.
पहिले तोडतात दात, नंतर चाखतात रक्त
येथील काही लोक जंगलातील साप पकडण्याचा धंदा करतात. साप पकडल्यावर रेस्तरॉंच्या मालकांना विकले जातात. त्यांच्या मांसापासून वेगवेगळ्या डिशेस तयार केल्या जातात. व्हिएतनाममध्ये या डिशेस खुप लोकप्रिय आहेत. या तयार करताना प्रथम सापांना पकडून दात तोडले जातात. त्यानंतर गळ्याजवळ चिरा देऊन रक्त काढले जाते. त्याचे हृदय काढून लोकांना ताटात वाढले जाते. त्यानंतर सापाची स्किन काढली जाते. मांसापासून वेगवेगळ्या डिशेस तयार केल्या जातात.
पुढील स्लाईडवर बघा, सापाला कसे मारले जाते... त्याचे रक्त चाखले जाते... त्याचे हृदय खाल्ले जाते...