आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावात मिळणार नाहीत पुरुष; विवाह, प्रेमासाठी होतेय तरुणींची तगमग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलच्या नोइवा दो कोरडेएरो गावातील मुली. - Divya Marathi
ब्राझीलच्या नोइवा दो कोरडेएरो गावातील मुली.
नोइवा दो कोरडेएरो - ब्राझीलच्या या गावाची कहानी ग्रीकच्या काल्पनिक कथांसारखी आहे. येथे डोंगरांमध्ये एक छोटेसे गाव आहे आणि येथे राहणाऱ्या सुंदर महिला त्यांच्यावर प्रेम करणारे कोणीतरी भेटावे याच प्रतीक्षेत आहेत. 600 महिला असलेल्या या गावामध्ये अविवाहित पुरुष मिळणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे वागदत्त वधूंचा वरासाठीचा शोध सुरुच आहे. याठिकाणचे पुरुष कामाच्या निमित्ताने शहरामध्ये राहतात, त्यामुळे संपूर्ण गावाची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर आहे.

गावातील 600 महिलांपैकी बहुतांश महिला 20 ते 35 वयोगटातील आहेत. येथे राहणाऱ्या नेल्मा फर्नांडिस हिच्या मते गावात एकतर विवाहीत पुरुष अाहेत किंवा किंवा नातेवाईक. त्यापैकी बहुतांश मुले नात्याने भाऊ आहेत. या गावातील मुलींच्या मते त्या सर्व प्रेमाची आणि विवाहाची स्वप्ने पाहतात. पण त्यांना गाव सोडायचे नाही. त्यांना विवाहानंतही याच गावात राहायचे आहे. लग्नानंतर मुलाने त्यांच्या गावात येऊन त्यांच्या नियमामुसार राहावे असे या मुलींना वाटते.

येथे काही महिला विवाहीत आहेत. पण त्यांचे पती आणि 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली मुले कामासाठी शहरापासून दूर राहतात. त्यामुळे येथे शेतीपासूनच ते इतर सर्व कामेही महिलाच करतात. कम्युनिटी हॉलसाठी टिव्ही खरेदी करण्यापासून ते सर्व प्रकारचे कार्यक्रम त्या एकत्रितपणे करत असतात. या गावाची ओळख या सशक्त अशा महिलांमुळे आहे. मारिया सेनहोरिनहा डी लीमा यांनी गावाची स्थापना केली होती. 1891 मध्ये त्यांना त्यांच्या चर्च आणि घरातून हाकलून देण्यात आले होते.

कसे सुरू झाले महिला राज्य
1940 मध्ये अॅनिसियो परेरा नावाच्या एका पादरींनी येथे वाढणारा समुदाय पाहता येथे एका चर्चची स्थापना केली होती. तसेच येथील लोकांसाठी मद्यपान म करणे, संगीत न ऐकणे, केस न कापणे असे नियम बनवले होते. 1995 मध्ये पादरीच्या मृत्यूनंतर महिलांनी निर्णय घेतला की पुरुषांनी तयार केलेल्या कोणत्याही नियमाचे त्या पालन करणार नाही. तेव्हापासून गावावर महिलांचे राज्य सुरू झाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्राझीलच्या या गावातील महिलांचे PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...