आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पोलिस फोर्समध्ये भरती होण्यासाठी महिलांना द्यावी लागते व्हर्जिनिटी टेस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडोनेशियाच्या महिला पोलिस - Divya Marathi
इंडोनेशियाच्या महिला पोलिस
इंडोनेशियाच्या पोलिस विभागात महिलांना भरती करण्यासाठी व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागते. व्हर्जिनिटी टेस्ट 'टू फिंगर टेस्ट'ने केली जाते. अनेक मानवी हक्क संघटना आणि इंटरनॅशनल मीडियाच्या टिकेनंतरसुध्दा सरकारने ही टेस्ट बंद केली नाही.
पुरुषांसमोर देतात सौंदर्याची परिक्षा...
महिला उमेदवारांना सिलेक्शन कमिटीसमोर परेडसुध्दा करावे लागते. या कमिटीमध्ये केवळ पुरुष असतात. असे म्हटले जाते, की यादरम्यान परिक्षक सुंदर तरुणींची निवड करतात. एका रिपोर्टनुसार, इंडोनेशिअन पोलिस विभागात हा नियम 1965पासून लागू करण्यात आला आहे.
इंडोनेशियाचे मॉडर्न पोलिस फोर्स, देशाच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1946मध्ये बनले होते. जवळपास 20 वर्षांनंतर म्हणजे 1966मध्ये पोलिस मिल्ट्रीच्या अंतर्गत गेले. 1999मध्ये अध्यक्ष सुहारतोच्या राजीनाम्यनंतर पुन्हा पोलिस फोर्सला स्वायत्तता मिळाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इंडोनेशिया महिला पोलिस फोर्सचे PHOTOS...