आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील एकमेव ज्वालामुखी जेथे आहे चक्क लिफ्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आइसलँड हे जगातील असे एकमेव ठिकाण आहे जेथे खूप जास्तप्रमाणात ज्वालामुखी होतात. हे जगातील एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी मॅग्मा चेंबरमध्ये जाण्यासाठी लोक लिफ्टचा वापर करातात. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उंची ऐवढे हे चेंबर खोल आहे.
आइसलँड जवजवळ 130 ज्वालामुखी पर्वतांनी वेढलेले आहे. यापैकी अनेक ज्वालमुखी कार्यक्षम आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी असल्याने याला ज्वालामुखीचे घर म्हटले जाते. येथे पोहचण्यासाठी पर्यटकांना पायी चालावे लागते.
40 वर्षांपूर्वी शोधले गेले
40 वर्षांपूर्वी 1974मध्ये ट्रिनुकागिगुर मॅग्मा चेंबर, गुहा विशेषतज्ञ डॉ. अर्नी बी स्टेफेंसनने शोधले होते. 2012 मध्ये हे चेंबर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.
येथे आहे- हे मॅग्मा चेंबर ट्रिनुकागिगुरची राजधानी रेकजाविकपासून दक्षिणेस 20 किमी अंतरावर आहे. हे चेंबर अटलांटिक समुद्राच्या मिड- अटलांटिक पर्वत रांगेत आहे.
नरकाचे द्वार
आइसलँडचे लावा पसरलेले क्षेत्र हे युद्धाचे क्षेत्र असल्याची दंतकथा आहे. देव आणि राक्षस यांच्यामध्ये याच ठिकाणी युद्ध होत असत. येथील लोक ज्वालामुखीच्या दरवाज्याला नरकाचे द्वार मानतात.
पुढील स्लाइडवर पाहा या ज्वालामुखीचे काही निवडक फोटो...