आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीही जागा होऊ शकतो हा धोकादायक ज्वालामुखी, अनेक किलोमीटर परिसरात होईल विनाश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्वालामुखीवर संशोधन करणारे Dr Michael Poland यांनी सांगितले आहे, की सर्वांत धोकादायक समजल्या जाणाऱ्या Yellowstone Volcano मध्ये मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या Volcano Observatory मध्ये रिसर्च करत असलेल्या या संशोधकाने सांगितले आहे, की आता या ज्वालामुखीतून लाव्हा नव्हे तर हायड्रोथर्मल इरप्शन होणार आहे. असे झाले तर या परिसरातील अनेक किलोमीटरमध्ये विध्वंस झालेला दिसून येईल. अनेक लोकांचे जीव जाण्याचीही भीती आहे.
 
काय आहे हायड्रोथर्मल इरप्शन
जमिनीच्या खाली असलेल्या पाण्याचा साठा जास्त उष्ण झाल्याने हायड्रोथर्मल इरप्शन (hydrothermal eruption) होते. हे एवढे उष्ण असते, की जमिनीला चीरत नेत अनेक किलोमीटर आकाशात फेकले जाते. त्यामुळे उष्ण पाण्यासह लाव्हा रसापासून तयार झालेले तुकडे आगीच्या गोळ्यांप्रमाणे जमिनीवर येवून कोसळतात.
 
१३ वर्षांपूर्वी झाला होता स्फोट
- डॉक्टर पोलंड यांनी सांगितले, की सुमारे १३ हजार वर्षांपूर्वी असा स्फोट झाला होता. त्यानंतर या परिसरात २.५ किलोमीटर लांब खड्डा तयार झाला होता.
- या दरम्यान लहान-मोठे स्फोट झाले आहेत. त्यावेळी लहान-मोठे खड्डेही पडले होते. पण आता होणारा स्फोट विनाशकारी असेल.
 
पुढील स्लाईडवर बघा, या ज्वालामुखीचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...