आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अजगराने गिळली अख्खी मगर, व्हिडिओ झाला व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यामध्ये एक अजगर मगरीला गिळताना दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. साप हळू-हळू मगरीला गिळण्यास सुरु करतो आणि अखेर संपूर्ण मगर त्याच्या पोटात जाते. यूट्यूबवर अनेक लोकांनी कमेंट करून व्हिडिओ खूपच भयावह असल्याचे सांगितले आहे. काही लोकांनी लिहिले, की त्यांना पहिल्यांदा माहित झाले, की अजगर काय करू शकतो.
अशी पहिलीच घटना नाहीये, यापूर्वी अजगराने मगरीला गिळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना यूनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा, अमेरिकेत रिसर्च करण्यात आले. त्यात एक आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आला. एका बर्मीज अजगराने मगरीला गिळले होते. त्यानंतर बायोलॉदिकल वैज्ञानिकांनी अजगराच्या शरीराचे काही दिवस एक्सरे केले आणि अजगर त्याची शिकार कसा पचवतो याचा शोध घेतला. मगरीला गिळल्यानंतर अजगराच्या शरीराची शक्ती वाढते आणि त्याच्या शरीराच्या अनेक अवयवांचा आकारसुध्दा वाढतो, याचा शोध वैज्ञानिकांना यामध्ये लागला.
जवळपास 7 दिवसांच्या एक्सरेमध्ये सातव्या दिवशी शोध लागला, की अजगराने मगरीचा मोठा भाग पचवला आहे आणि काही भागच शिल्लक आहे. अजगराच्या शरीरात वेगाने केमिकल रिअॅक्शन होऊ लागल्या होत्या, त्यामुळे मगरीला पचवणे त्याला शक्य झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अजगराने मगरीला कसे गिळले...