आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जगावेगळी परंपरा, लग्नाआधीच सोबत रात्र घालवतात तरुण-तरुणी!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न, संसार, पती-पत्नी याबाबत भारतीय संस्कृतीत वेग-वेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. परंतु जंगलात राहणार्‍या जमातींची परंपरा, विवाहाची पद्धत आपल्याला आपल्याला थक्क करणारे आहे. छत्तीसगडमधील अबूझमाड येथील जंगलात राहणार्‍या माडिया जमातीतील लोकांची विवाह पद्धती फारच निराळी आहे. या जमातीत लग्नाच्या आधीच तरुण-तरुणींना सोबत रात्र घालविण्याची सूट दिली जाते.

तरुण-तरुणी या एका रात्रीत एकमेकांच्या जवळ राहतात. परस्परांना समजून घेतात. त्यानंतर ते सोबत घालविलेल्या रात्रीबाबत आपापल्या घरच्या मंडळींना सांगत असतात. मग सगळ्या बाजूंचा विचार केल्यानंतर घरची मंडळी संबंधित तरुण-तरुणींचा विवाह निश्चित करतात.

माडिया जमात आणि अन्य समाजात एक साम्य दिसते. ते म्हणजे विवाहातील रुसव्या- फुगव्यांचे. वर पक्षाकडील मंडळींचे रुसवे- फुगवे वधू पक्षाला मान्य करावे लागतात. एवढेच नाही तर वधु पक्षातर्फे एक ठराविक रक्कम वर पक्षाला द्यावी लागले.

या जमातीत अविवाहीत मुली रात्री झोपडीत झोपत नाहीत. लग्नाआधी विवाहोत्सूक तरुणींना रात्री पळवून नेले जाते. तरुण- तरुणी रात्र एकत्र घालवतात. विशेष म्हणजे वयात आलेल्या मुला-मुलींना त्यांच्या वरिष्ठांकडून लैंगिक शिक्षण दिले जाते.

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, जंगलात राहणार्‍या जमातींमधील विवाहाच्या परंपरा...