आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weird: Inside Chinese Fur Farms Which Breed Dogs To Make Coat For The West

SHOCKING: चीनमध्ये श्वानांची कातडी विकून कमावले जातात पैसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बिजींगच्या बाजारात बंदिस्त असलेले श्वान, दुस-या छायाचित्रात त्याची कातडी काढताना कामगार)

जगभरात अनेक ठिकाणी लोक श्वान मारून त्यांचे मांस खातात. त्यांचे मांस मोठ्या किमतीत विकलेही जाते. परंतु काही ठिकाणी त्यांची कातडीसुध्दा विकली जातात, हे कदाचितच कुणाला ठाऊक असेल. त्यांच्या कातड्यांपासून डिझाइनर कोट किंवा इतर वस्तू बनवल्या जातात. अलीकडे चीनची राजधानी बिजींगमध्ये प्राण्यांच्या अधिकारासाठी लढणा-या संघटनेने याचा खुलासा केला आहे.
संघटनाशी जोडलेल्या लोकांनी एक आठवड्यापर्यंत छुपे कॅमे-याव्दारे बिजींगच्या मार्केट आणि फॉर्मचे फोटो काढले आहेत. येथे श्वान मारून त्यांचे कातडे काढण्याचे काम केले जाते. अॅनिमल एक्टिव्हिस्टशी जोडलेल्या लोकांचे म्हणणे आहे, की याचा पुरवठा अनेक यूरोपिअन देशांत केला जातो. केवळ चीनच नव्हे यापूर्वी ब्रिटेन, फिनलँड, स्पेनसह अनेक देशांतसुध्दा श्वानांचे कातडे विकले जातात. मात्र 2000मध्ये ब्रिटेनमध्ये यावर बॅन आणला होता.
बिजींगमध्ये छुप्या कॅमे-यात श्वानांच्या कातड्यांचे फोटो काढणारे दोन व्यक्ती लॉस एंजेलिसचे रहिवासी होते. ही दोन व्यक्ती तेथील प्राण्यांच्या अधिकारासाठी लढतात. या संस्थेचे संस्थापक जोल वाले यांनी डेली मेलला सांगितले, की मीसुध्दा ही फोटो समोर आणण्यासाठी गेलो होतो. मी यात सामील आहे. आम्ही तिथे पाहिले, की श्वानांना मारून त्यांचे कातडे काढले जाते आणि त्यांचे मांस इतर प्राण्यांना खायला दिले जाते. श्वानांना पिंज-यात बंद करून ठेवले जाते आणि त्यांना पिण्यासाठी पाणीसुध्दा दिले जात नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेची काही छायाचित्रे...