आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Welcome To Bolivia\'s Death Road, The Terrifying Route

VIDEO: जगातील सर्वात धोकादायक रस्ता, प्रवास करताना मनात धाकधुक होते सुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात अनेक रस्ते आहेत, जिथे ड्रायव्हिंग करणे खेळ नाहीये. कारण येथे ड्राइव्हिंग करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे. तरीदेखील अशा रस्त्यांवरून लोकांची रहदारी कायम असते. असाच एक रस्ता बोलिव्हियाच्या युंगास प्रांतात आहे. या रस्त्याला 'रोड ऑफ द डेथ' नावाने ओळखले जाते. याला जगातील सर्वात भयावह रस्त्याचा दर्जा मिळाला आहे.
बोलिव्हियन अँडिजमध्ये स्थित या रस्त्याची लांबी 64 किलोमीटर असून घसरणारा आहे. त्यामुळे ड्राइव्हिंगवेळी गाड्यांचे टायर दरीत स्लिप होण्याची दाट शक्यता असते. तसेच याचा उतार खूप धोकायदायक आहे. अनेक ठिकाणी अशी स्थिती आहे, जिथे दोन कार एकाचवेळी त्या ठिकाणावरून जाऊ शकत नाहीत.
रस्ता पार करताना अटकतो जीव-
या रस्त्यावर ड्रायव्हिंग करणारे आणि त्यावरून जाणा-या लोकांच्या मनाच धाकधुक सुरु होते. अनेकदा गाड्यांचे एक टायर रस्त्याच्या खाली अटकलेले असते, ते टायर रस्त्यावर आणणे जोखमिचे ठरते. या प्रक्रियेत अनेक गाड्या दरीत कोसळतात. दरवर्षी या रस्त्यावर 300 लोकांचा मनुष्याचा मृत्यू होतो. हा रस्ता समुद्रापासून 15,400 फुट उंच आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या रस्त्याचे काही फोटो...